शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

FIFA Football World Cup 2018 : थरारक सामन्यात इंग्लंडचा विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2018 2:29 AM

फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील अखेरची उपउपांत्य फेरीची लढत रंगतदार झाली.  इंग्लंडचा उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित मानला जात होता, परंतु कोलंबियाने सामन्याला नाट्यमय कलाटणी दिली.

मॉस्को - फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील अखेरची उपउपांत्य फेरीची लढत रंगतदार झाली.  इंग्लंडचा उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित मानला जात होता, परंतु कोलंबियाने सामन्याला नाट्यमय कलाटणी दिली. दोन्ही संघाकडून तोडीसतोड खेळ झाला. पेनल्टी शूटआऊटमध्येही नाट्याचे सत्र सुरुच राहिले. कोलंबियाच्या गोलरक्षकाने इंग्लंडला बॅकफुटवर टाकले, परंतु आघाडीच्या संधीवर त्यांच्या खेळाडूकडून चुकीचा फटका बसला. त्यानंतर गोलरक्षक जॉर्डन पिकफोर्डने इंग्लंडच्या विजयाचा पाया रचला आणि एरीक डायरने त्यावर विजयाचा कळस चढवला. इंग्लंडने 4-3 (1-1) अशी बाजी मारून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यांच्यासमोर स्वीडनचे आव्हान असणार आहे.

इंग्लंडला पहिल्या सत्रात वर्चस्व गाजवूनही कोलंबियाने गोलशून्य बरोबरीत रोखले. संघाचा प्रमुख खेळाडू जेम्स रॉड्रीगेज दुखापतीमुळे या लढतीला मुकला. त्याही परिस्थितीत कोलंबियाने कौतुकास्पद खेळ केला. 41 व्या मिनिटाला पेनल्टी क्षेत्राबाहेरून मिळालेल्या फ्री किकवर इंग्लंडच्या खेळाडूला अपयश आले. सामन्याच्या सुरुवातीलाच हॅरी केनने हेडरव्दारे गोल करण्याचा केलेला प्रयत्न अयशस्वी ठरला.  मध्यंतरानंतर दोन्ही संघांकडून गोलचे वारंवार प्रयत्न सुरू झाले, परंतु 58व्या मिनिटाला पेनल्टी स्पॉट किकवर इंग्लंडने आघाडी घेतली. कार्लोस सांचेझने पेनल्टी क्षेत्रात इंग्लंडच्या कर्णधार हॅरी केनला पाडले आणि पंचांनी त्वरीत स्पॉट किकचा इशारा दिला. केनने त्यावर कोलंबियाच्या गोलरक्षक डेव्हिड ऑस्पिनाला चकवून इंग्लंडला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडकडून सर्वाधिक गोल करणा-या खेळाडूंमध्ये केन ( 7) दुस-या स्थानी झेप घेतली आहे. या यादित गॅरी लिनकर दहा गोलसह अव्वल स्थानावर आहेत. 81व्या मिनिटाला कोलंबियाला बरोबरीची आयती संधी चालून आली होती, परंतु बाक्काने ती गमावली. भरपाई वेळेच्या तिस-या मिनिटाला येरी मिनाने हेडरव्दारे अप्रतिम गोल करून कोलंबियाला विजयाच्या आशा दाखवल्या. त्यामुळे भरपाई वेळेत सुटणारा हा सामना अतिरिक्त 30 मिनिटांच्या खेळात ताणला गेला. त्यातही निकाल 1-1 असाच राहील्याने पेनल्टी शूटआऊटचा खेळ रंगला.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८FootballफुटबॉलSportsक्रीडाEnglandइंग्लंडColombiaकोलंबिया