FIFA Football World Cup 2018 : या दिग्गजाकडून  मॅब्प्पेचे अभिनंदन !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2018 00:09 IST2018-07-02T00:08:33+5:302018-07-02T00:09:00+5:30

फ्रान्सचा कायलीन मॅब्प्पे सध्या चांगलाच चर्चेत आहे. विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीत फ्रान्सने गतउपविजेत्या अर्जेंटिनाचा पत्ता कट केला आणि या विजयात 19 वर्षीय मॅब्प्पेने दोन गोल करून विजयात सिंहाचा वाटा उचलला.

FIFA Football World Cup 2018: Congratulations to Mbppe! | FIFA Football World Cup 2018 : या दिग्गजाकडून  मॅब्प्पेचे अभिनंदन !

FIFA Football World Cup 2018 : या दिग्गजाकडून  मॅब्प्पेचे अभिनंदन !

मॉस्को - फ्रान्सचा कायलीन मॅब्प्पे सध्या चांगलाच चर्चेत आहे. विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीत फ्रान्सने गतउपविजेत्या अर्जेंटिनाचा पत्ता कट केला आणि या विजयात 19 वर्षीय मॅब्प्पेने दोन गोल करून विजयात सिंहाचा वाटा उचलला. याच बरोबर त्याने पेले यांनी 1958 मध्ये नोंदवलेल्या विक्रमाशी बरोबरी केली. विश्वचषक स्पर्धेत एका सामन्यात दोन गोल करणारा पेले यांच्यानंतर तो पहिलाच युवा खेळाडू ठरला आहे. 


मॅब्प्पेने केलेल्या कामगिरीनंतर ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांनी अभिनंदनाचा मॅसेज पाठवला.  


 

Web Title: FIFA Football World Cup 2018: Congratulations to Mbppe!