FIFA FOOTBALL World Cup 2018: ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमार झाला फिट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2018 21:16 IST2018-06-21T21:16:21+5:302018-06-21T21:16:21+5:30
नेयमार पूर्णपणे फिट झाल्याचे संघ व्यवस्थापनाने सांगितले आहे.

FIFA FOOTBALL World Cup 2018: ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमार झाला फिट
सोची : ब्राझीला स्टार फुटबॉलपटू नेमार आता पूर्णपणे फिट झाला आहे. त्यामुळे आता यापुढील ब्राझीलच्या सामन्यात नेमार कशी कामगिरी करतो, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल.
विश्वचषक स्पर्धेपूर्वी सराव करताना नेमार पूर्णपणे फिट नव्हता. त्यामुळे तो विश्वचषकात खेळणार की नाही, याबाबत संदिग्धता होती. पण नेमार विश्वचषकातील पहिल्या सामन्यात खेळला होता. पहिल्या सामन्यात नेमारला प्रतिस्पर्धी स्वित्झर्लंडने तब्बल आठवेळा जमिनीवर पाडले होते. त्यामुळे नेमार यापुढील सामन्यांमध्ये खेळणार की नाही, याबाबत संदिग्धता होती. पण आता नेयमार पूर्णपणे फिट झाल्याचे संघ व्यवस्थापनाने सांगितले आहे.
Duelo @neymarjr e @alissonbecker no treino desta quarta-feira. O atacante tá com a pontaria em dia, mas o goleirão foi buscar uma! #GigantesPorNatureza#Copa2018pic.twitter.com/LDFEjUns4G
— CBF Futebol (@CBF_Futebol) June 20, 2018
ब्राझीलच्या फुटबॉल महासंघाने सांगितले आहे की, " काही जणांना नेमार विश्वचषकासाठी फिट नाही, असे वाटत होते. पण दुसऱ्या सामन्यासाठी सराव करताना नेमारला पाहिले आणि तो पूर्णपणे फिट असल्याची खात्री पटली आहे. "