ब्राझीलचा प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारसोबत एक सर्वात खतरनाक, आश्चर्यकारक गोष्ट घडली आहे. नेमारच्या ओळखीच्या नसलेल्या एका अब्जाधीशाने नेमारच्या नावे सर्व संपत्ती करून टाकली आहे.
ब्राझीलच्या एका अब्जाधीश व्यावसायिकाने त्याची संपूर्ण मालमत्ता स्टार फुटबॉलपटू नेमार ज्युनियरला दिली आहे. ब्राझीलच्या वृत्तसंस्थांनुसार हे दोघे कधीही एकमेकांना भेटले नव्हते. तसेच ओळखतही नव्हते. त्या अब्जाधीशाला नेमार माहिती होता. १२ जूनला या अब्जाधीशाने ब्राझीलमधील एका सरकारी कार्यालयात आपले मृत्यूपत्र बनविले. त्यावेळी दोन साक्षीदारही हजर होते. या मृत्यूपत्राला ब्राझिलच्या न्यायालयाने अद्याप मंजुरी दिलेली नाही, असे यात म्हटले आहे.
व्यावसायिकाने त्यांची ८४६ दशलक्ष पौंड किमतीची मालमत्ता नेमारला दिली आहे. भारतीय चलनात ही संपत्ती १० हजार कोटींपेक्षा जास्त आहे. यानंतर या अब्जाधीशाचा मृत्यू झाला आहे. त्याला मुलबाळ नसल्याने या अब्जाधीशाने नेमारला ही संपत्ती दिल्याचे सांगितले जात आहे.
नेमारचे त्याच्या वडिलांशी चांगले संबंध आहेत, हेच या अब्जाधीशाला भावले होते. त्याला त्याच्या वडिलांची आठवण येत होती. यामुळे त्यांनी नेमारची आपल्या संपत्तीचा वारसदार म्हणून निवड केली आहे. नेमार हा ३३ वर्षीय फुटबॉलपटू आहे. त्याची स्वत:ची संपत्ती हजार कोटींहून अधिक आहे. जगातील सर्वात श्रीमंत फुटबॉलपटूंमध्ये त्याची गणना होते.