शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

अरे बापरे! दिग्गज फुटबॉलपटू डिएगो मॅराडोनाची अशी अवस्था? जाणून घ्या Video मागचं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2020 11:17 AM

अर्जेंटिना संघाचे प्रतिनिधित्व करताना त्यानं 91 सामन्यांत 34 गोल्स केले. 1986च्या फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत त्याच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनानं जेतेपद पटकावलं होतं. त्या स्पर्धेत त्याला गोल्डन बॉल पुरस्कारही मिळाला होता.

दिग्गज फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना नेहमी वादग्रस्त कारणामुळे चर्चेत असतात. प्रशिक्षकाचा कार्यकाळ असो किंवा स्टेडियममध्ये त्यांची उपस्थिती नेहमी वादात अडकली गेली. अर्जेटिंनाचे हे दिग्गज फुटबॉलपटून सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. त्यात दिसणारी व्यकी ही मॅराडोना असल्याचा दावा केला जात आहे. पण, हे खरं आहे का?

या व्हिडीओतील मॅराडोनासारखा दिसणारी व्यक्ती टेनिस चेंडूसह फुटबॉलचा सराव करताना दिसत आहे. एखाद्या सुमो रेसलर प्रमाणे मॅराडोनाचं वजन वाढल्याचा या व्हिडीओतून दिसत आहे. पण, त्याचे फुटबॉल कौशल्य पाहून ही व्यक्ती मॅराडोनाच असल्याचा दावा केला जात आहे. सार्वजनिक ठिकाणी मॅराडोनाला अखेरचे पाहिले गेले तेव्हा त्याचे वजन प्रचंड वाढल्याचे दिसले होते आणि त्यामुळेच व्हिडीओत दिसणारी व्यक्ती ही मॅराडोनाच आहे, अशी चर्चा रंगली आहे.पण, हे सत्य नाही. व्हिडीओत दिसणारी व्यक्ती ही रोली सेरानो आहे. 2015मध्ये हॉलिवूड चित्रपट 'यूथ' यामधील तो भाग आहे. त्यामुळे व्हिडीओत दिसणारी व्यक्ती मॅराडोना नाही हे स्पष्ट होत आहे.  मग मॅराडोना कुठेय?मॅराडोना सध्या अर्जेटिनातील क्लब गिम्नासिया व्हाय एस्ग्रीमाचे प्रशिक्षकपद भूषवित आहे. बुधवारीच क्लबने त्याच्यासोबतचा करार वाढवला.  

अर्जेंटिना संघाचे प्रतिनिधित्व करताना त्यानं 91 सामन्यांत 34 गोल्स केले. 1986च्या फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत त्याच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनानं जेतेपद पटकावलं होतं. त्या स्पर्धेत त्याला गोल्डन बॉल पुरस्कारही मिळाला होता. 

आपण अजूनही रानटीच आहोत! गर्भवती हत्तीणीच्या हत्येचा रोहित, विराटसह क्रीडा विश्वातून तीव्र निषेध

टॅग्स :FootballफुटबॉलSocial Viralसोशल व्हायरल