मुक्या प्राण्याची माया; अर्जेंटिनाच्या फुटबॉलपटूचा विमान अपघातात मृत्यू, कुत्रा आठवणीने व्याकूळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 15:15 IST2019-02-05T15:15:38+5:302019-02-05T15:15:55+5:30

अर्जेंटिनाचा 28 वर्षीय फुटबॉलपटू एमिलियानो सालाचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला.

Emiliano Sala's loyal dog waits for its owner to return home | मुक्या प्राण्याची माया; अर्जेंटिनाच्या फुटबॉलपटूचा विमान अपघातात मृत्यू, कुत्रा आठवणीने व्याकूळ

मुक्या प्राण्याची माया; अर्जेंटिनाच्या फुटबॉलपटूचा विमान अपघातात मृत्यू, कुत्रा आठवणीने व्याकूळ

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा 28 वर्षीय फुटबॉलपटू एमिलियानो सालाचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला. इंग्लिश प्रीमिअर लीगमधील कार्डिफ सिटी या क्लबचा सदस्य असलेला एमिलियानो 21 जानेवारीला फ्रान्समधून लंडनसाठी रवाना झाला. मात्र, त्याच्या विमानाशी संपर्क तुटला होता आणि सोमवारी तो विमान इंग्लिश खाडीत अपघातग्रस्त अवस्थेत सापडला. त्यात तपास अधिकाऱ्यांना एक मृतदेह सापडला आणि तो एमिलियानोचा असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे एमिलियानोच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. 

कुटुंबीय हे दुःख पचवण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु त्याचा कुत्रा अजूनही एमिलियानोची वाट पाहत आहे. एमिलियानोच्या बहीण रोमिानाने फेसबुक वॉलवर एक फोटो पोस्ट केला आहे. त्यात एमिलियानोचा कुत्रा दरवाज्यावर बसून मालकाची वाट पाहत असल्याचे दिसत आहे. तिने त्या फोटोखाली लिहीले की,'' नाला तुझी वाट पाहतोय...'' नालाला अजूनही एमिलियानो फ्रान्समधून परत येईल आणि सोबत खेळेल, अशी आस आहे. 

Web Title: Emiliano Sala's loyal dog waits for its owner to return home