जगभरात कोरोना विषाणूनं हाहाकार माजवला आहे. अनेक देशात कोरोनाच्या धास्तीनं शाळा, कॉलेजसह मॉल्स बंद ठेवण्यात आले आहेत. चीनच्या वुहानमध्ये केंद्रबिंदू असलेल्या या कोरोनानं जगभरात पाय पसरले आहेत. जगभरात 156,396 कोरोना विषाणूनं संक्रमित झालेले रुग्ण आढळून आले असून, त्यात चीनमध्ये जवळपास 80955 कोरोना संक्रमित रुग्ण आहेत. त्याच्या खालोखाल इटलीमध्ये 21,157 रुग्ण संक्रमित असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत जगात कोरोना संक्रमित 5833 लोकांचा मृत्यू झाला आहे. 

कोरोना विषाणूचा क्रीडाविश्वालाही फटका बसला आहे. अनेक लीग रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. कोरोना विषाणूशी लढण्यासाठी जगभरातील क्रीडा क्षेत्रही एकवटले आहे. दिग्गज खेळाडूंकडून नागरिकांना आवाहन केलं जात आहे. पण, आवाहनापर्यंत मर्यादित न राहता जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोनं एक पाऊल पुढे टाकलं आहे.

पोर्तुगाल फुटबॉल संघाचा कर्णधार आणि युव्हेंटस क्लबचा खेळाडू रोनाल्डो सध्या सीरि ए लीग रद्द झाल्यामुळे मायदेशात आपल्या कुटुंबीयांसोबत आहे. त्यानं जगभरातील त्याच्या चाहत्यांना कोरोना विषाणूशी लढण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याचं आव्हान केलं आहे. तो म्हणाला,''आज जग कठीण प्रसंगातून जात आहे. अशावेळी प्रत्येकानं स्वतःची नेहमीपेक्षा अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. मी आज तुमच्याशी एक फुटबॉलपटू म्हणून नव्हे, तर एक मुलगा, एक बाप म्हणून सवांद साधत आहे. मी सर्वांना विनंती करतो की जागतिक आरोग्य संघटनेनं ( WHO) केलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करा. एखाद्याचं आयुष्य वाचवणे हे प्राधान्य आहे.''

हे आवाहन करण्यापलीकडे रोनाल्डोनं एक पाऊल पुढे टाकलं आहे. त्यानं पोर्तुगालमधील त्याच्या सर्व हॉटेल्सचे रुपांतर हॉस्पिटलमध्ये केले आहे. त्या हॉस्पिटलमध्ये कोरोना विषाणूनं संक्रमित असलेल्यांवर मोफत उपचार केले जाणार असल्याचाही निर्णय त्यानं घेतला आहे. एवढेच नव्हे, तर येथे उपचार देणाऱ्या डॉक्टर आणि नर्स यांचा पगारही रोनाल्डो स्वतःच्या खिशातून करणार आहे.  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Corona Virus मुळे आता 'मिनी आयपीएल'चा प्रस्ताव; वर्ल्ड कपचा फॉरमॅट कॉपी करणार? 

Coronavirus: रायगड, पनवेलमधील खेळाडू शारजाहून परतले; 14 दिवसांसाठी निरिक्षणाखाली

वटवाघूळ खाण्याची, त्यांचं रक्त व लघवी पिण्याची गरजच काय?; Corona Virusवरून पाक गोलंदाज भडकला

IPL 2020 : आयपीएल होणार की नाही? BCCIच्या बैठकीत सात पर्यायांवर झाली चर्चा

IPL 2020 : प्रेक्षकांविना क्रिकेट खेळण्यात मजा नाही; वीरेंद्र सेहवागची स्पष्ट भूमिका

Web Title: Cristiano Ronaldo will transform hotels to help fight Coronavirus svg 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.