पॅरीस : जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंमध्ये आघाडीवर असलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोनं एक धक्कादायक खुलासा केला आहे. रेयाल माद्रिदला सोडचिठ्ठी देत युव्हेंटस क्लबकडून खेळणाऱ्या रोनाल्डोनं नुकत्या एका मुलाखतीत प्रेयसी जॉर्जिना रॉड्रीगेजबद्दल गौप्यस्फोट केला. 

ख्रिस्तियानो रोनाल्डोनं बुधवारी मध्यरात्री युरो 2020च्या पात्रता स्पर्धेत गोलधडाका लावला. लिथूनियाविरुद्धच्या सामन्यात रोनाल्डोनं 4 गोल करताना पुन्हा एकदा कट्टर प्रतिस्पर्धी लिओनेल मेस्सीवर कुरघोडी केली. 34 वर्षीय रोनाल्डोच्या या चार गोलमुळे पोर्तुगाल संघाने 5-1 असा दणदणीत विजय मिळवला. या कामगिरीसह रोनाल्डोनं आपल्या आंतरराष्ट्रीय गोल्सची संख्या 93 अशी केली आहे. या क्रमवारीत इराणचे दिग्गज अली डाएई 109 गुणांसह अव्वल स्थानी आहेत.

रोनाल्डो सध्या युव्हेंटस क्लबचे प्रतिनिधित्व करत आहे. क्लब आणि देश यांच्यासाठी एका सामन्यात सर्वाधिक 3 किंवा त्यापेक्षा अधिक गोल करणाऱ्या विक्रमात रोनाल्डो आघाडीवर आहे. त्यानं 54 वेळा अशी कामगिरी केली आहे, तर मेस्सीला 51 वेळाच हा पल्ला पार करता आला. एका सामन्यात 4 पेक्षा अधिक गोल करण्याच्या बाबतीतही रोनाल्डो आघाडीवर आहे. त्यानं 10 वेळा, तर मेस्सीनं 6 वेळा एका सामन्यात 4 किंवा त्यापेक्षा अधिक गोल केले आहेत. 

रोनाल्डोनं 37 प्रतिस्पर्धींविरुद्ध एकाच सामन्यात 3 किंवा त्यापेक्षा अधिक गोल करण्याचा पराक्रम केला आहे. या बाबतीतही मेस्सी ( 32) पिछाडीवर आहे. युरोपियन क्वालिफायर सामन्यात सर्वाधिक गोल्सचा विक्रमही रोनाल्डोनं नावावर केला आहे. त्यानं आयर्लंडच्या रॉबी किनच्या 23 गोल्सचा विक्रम मोडला. या सामन्यापूर्वी रोनाल्डोच्या खात्यात 20 गोल्स होते आणि आता ती संख्या 24 अशी झाली आहे. 

पोर्तुगाल संघाचा प्रमुख खेळाडू रोनाल्डो आणि जॉर्जिना हे 2016पासून एकत्र आहेत. त्यांना एक मुलगी आहे. रोनाल्डो म्हणाला,''सर्वोत्तम गोलपेक्षा गर्लफ्रेंडसोबत सेक्स करण्याचा आनंद अधिक सुखावणारा आहे. त्याची तुलना होऊच शकत नाही. ''

Web Title: Cristiano Ronaldo Says Sex with Girlfriend is Better Than his Best Goal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.