Cristiano Ronaldo : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या 'गूड न्यूज'ने मोडले सर्व विक्रम; लिओनेल मेस्सीला टाकले मागे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2021 00:35 IST2021-10-30T00:29:48+5:302021-10-30T00:35:59+5:30
पोर्तुगाल फुटबॉल संघाचा कर्णधार आणि मँचेस्टर युनायटेडचा सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोनं ( Cristiano Ronaldo) इंस्टाग्रामवरून चाहत्यांना एक गूड न्यूज जिली.

Cristiano Ronaldo : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या 'गूड न्यूज'ने मोडले सर्व विक्रम; लिओनेल मेस्सीला टाकले मागे
पोर्तुगाल फुटबॉल संघाचा कर्णधार आणि मँचेस्टर युनायटेडचा सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोनं ( Cristiano Ronaldo) इंस्टाग्रामवरून चाहत्यांना एक गूड न्यूज जिली. रोनाल्डो व त्याची प्रेयसी जॉर्जिय रॉडिग्ज (Georgina Rodriguez) ही लवकरच जुळ्या बाळांना जन्म देणार आहे. रोनाल्डोनं इंस्टाग्रामवर तिच्यासोबचा फोटो पोस्ट करून ही गोड बातमी दिली. रोनाल्डोनं शेअर केलेल्या या गोड बातमीला आतापर्यंत २ कोटी ८१ लाख ४०,६२० हून अधिक लाईक्स मिळाले आहेत आणि आतापर्यंत इंस्टाग्रामवर इतके लाईक्स मिळालेला तो जगातील पहिलाच खेळाडू आहे. रोनाल्डोचे इंस्टाग्रावर सर्वाधिक ३६० मिलियन फॉलोअर्स आहेत.
रोनाल्डोनं या फोटोसह आधीच्या चार मुलांसह स्विमींग पूलमधील फोटोही पोस्ट केला आहे. २०१७मध्येही रोनाल्डो जुळ्या मुलांचा बाबा झाला होता. एवा आणि मातियो अशी त्यांची नावं आहेत. यातील एवा मुलगी असून मातियो मुलगा आहेत. तर रोनाल्डो ज्युनियर आणि अलाना मार्टिना अशीही त्याच्या इतर मुलांची नावं आहेत. रोनाल्डोनं आज केलेल्या पोस्टवर लिहिलं की,''ही गोड बातमी सांगताना आनंद होतोय की आम्ही जुळ्या मुलांचे आई-बाबा बनणार आहोत.''
रोनाल्डोनं मोडला मेस्सीचा विक्रम
इंस्टाग्रामवर लिओनेल मेस्सीच्या एका फोटोला सर्वाधिक २२.१ मिलियन लाईक्स मिळाले होते आणि तो विक्रम आज रोनाल्डोकडून मोडला गेला. मेस्सीनं पॅरीस सेंट जर्मेन क्लबमध्ये जाण्याची घोषणा केली, त्या फोटोला सर्वाधिक लाईक्स होते. रोनाल्डोच्या मँचेस्ट युनायटेड क्लबमधील आगमनाच्या पोस्टला १ कोटी २९ लाख ७ हजार २२ लाईक्स मिळाल्या होत्या. एखाद्या क्लबच्या इन्स्टाग्राम पोस्टला मिळालेल्या या सर्वाधिक लाईक्स आहेत.