फुटबॉलला बसली कोरोनाची किक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 04:02 IST2020-03-16T04:02:17+5:302020-03-16T04:02:39+5:30
एआयएफएफने शनिवारी यासंदर्भात माहिती दिली. यामुळे १५ मार्चनंतर सुरु होणारे आय लीगमधील सर्व सामने स्थगित झाले आहे.

फुटबॉलला बसली कोरोनाची किक!
नवी दिल्ली : कोरोनाचा धोका वाढू नये यासाठी भारत सरकारने लागू केलेल्या मार्गदर्शन तत्वांमुळे आखिल भारतीय फुटबॉल संघटनेने (एआयएफएफ) देशभरातील सर्व स्पर्धा ३१ मार्चपर्यंत स्थगित केल्या. एआयएफएफने शनिवारी यासंदर्भात माहिती दिली. यामुळे १५ मार्चनंतर सुरु होणारे आय लीगमधील सर्व सामने स्थगित झाले आहे.
३१ मार्च पर्यंत राज्यात कोणत्याही क्रीडा स्पर्धा होणार नसल्याचे पश्चिम बंगाल सरकारने यापुर्वीच घोषित केले आहे. या निर्णयामुळे रविवारी होणारी पश्चिम बंगाल विरुद्ध मोहन बागान हा सामनाही रद्द करण्यात आला.