Corona Virus : Former India captain Bhaichung Bhutia offers shelter to migrant workers svg | Corona Virus : टीम इंडियाच्या माजी कर्णधारानं स्थलांतरित कामगारांना दिला निवारा

Corona Virus : टीम इंडियाच्या माजी कर्णधारानं स्थलांतरित कामगारांना दिला निवारा

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. त्यामुळे अनेक राज्यांतून कामगार स्थलांतराचे प्रमाण वाढले. दिल्ली आणि महाराष्ट्रातूनही परप्रांतिय कामगारांनी घराकडची वाट धरली आहे. रोजंदारीवर पोट असलेल्या या कामगारांवर लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली आहे आणि त्यात कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे त्यांना घरच्यांचा ओढा लागला आहे. पण, आता राज्यांच्याही सीमा बंद करण्यात आल्यामुळे स्थलांतरित कामगारांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. अशा स्थलांतरित कामगारांसाठी टीम इंडियाचा माजी कर्णधार पुढे आला आहे. 

'सुपर मॉम' मेरी कोमचं मोठं मन; Coronaशी मुकाबला करण्यासाठी 1 महिन्याचा पगार अन् 1 कोटींचं दान

भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार भायचुंग भुतीयानं स्थलांतरित कामगारांसाठी निवाऱ्याची सोय केली आहे. सिक्कीम येथील लुमसी, टॅडोंग येथे भुतीयानं स्थलांतरित कामगारांसाठी स्वतःची इमारत खुली केली आहे तेथे कामगारांच्या राहण्याची सोय त्यानं केली आहे. ''अनेक स्थलांतरित कामगार सिक्कीममध्ये अडकले आहेत. सिक्कीममध्ये अजूनतरी कोरोना व्हायरसचा रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे मी माझ्या इमारतींमध्ये कामगारांच्या राहण्याची सोय करण्याचा निर्णय घेतला आहे,''असे भुतीयानं सांगितले.

तो पुढे म्हणाला,''लॉकडाऊनमुळे मी कोलकाताहून येथे परत आलो. त्यामुळे मी इथूनच सर्व परिस्थितीची नोंद घेत आहे. माझ्या इमारतीमध्ये 100 लोकांच्या राहण्याची सोय होऊ शकते. पाच माळ्याच्या इमारतीत 10 कामगार आधीपासून राहत आहेत. त्यांना आम्ही जेवणही पुरवत आहोत. आम्ही स्थानिक सरकारकडेही मदतीची मागणी करत आहे.'' 

भारताचा हा दिग्गज स्ट्रायकर आणि त्याची युनायटेड सिक्कीम एफसी क्लबही बंगालमध्ये स्थलांतरित कामगारांना रेशन देण्याचं काम करत आहेत.''स्थानिक प्रशासनाशी आम्ही चर्चा करत आहोत. बंगालमध्ये जे शक्य आहे, ते आम्ही करतोय. स्थलांतरित कामगारांसाठी आम्ही मेहनत घेत आहे,''असेही 43 वर्षीय खेळाडूनं सांगितलं.  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Corona Virus : पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूचा कोरोनामुळे मृत्यू

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप उंचावणारे 'ते' खेळाडू सध्या काय करतात?

विराट-अनुष्कानं नक्की किती रुपयांची केली मदत? आकडा जाणून तुम्हीही व्हाल थक्क

क्रिकेट चाहत्यांसाठी GOOD NEWS; पुन्हा अनुभवा भारत-पाकिस्तान सामन्यांचा थरार!

 

Web Title: Corona Virus : Former India captain Bhaichung Bhutia offers shelter to migrant workers svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.