ब्राझीलच्या स्टार फुटबॉलपटूवर बलात्काराचा आरोप, पॅरिसमध्ये घडला प्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2019 15:45 IST2019-06-02T15:44:49+5:302019-06-02T15:45:23+5:30

महिला ब्लॅकमेल करत असल्याचा दावा फुटबॉलपटूच्या वडिलांनी केला.

Brazilian football star Neymar accused of raping woman in Paris hotel, claim media reports | ब्राझीलच्या स्टार फुटबॉलपटूवर बलात्काराचा आरोप, पॅरिसमध्ये घडला प्रसंग

ब्राझीलच्या स्टार फुटबॉलपटूवर बलात्काराचा आरोप, पॅरिसमध्ये घडला प्रसंग

पॅरिस : ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेयमार याच्यावर एका अज्ञात महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. येथील स्थानिक मीडियाच्या वृत्तानुसार पिडीत महिलाने नेयमारवर मारहाण आणि बलात्कार केल्याचा आरोप केला आहे, हा सर्व प्रसंग पॅरिसच्या एका हॉटेलमध्ये घडल्याचा तिचा दावा आहे. मात्र, नेयमारने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ही महिला ब्लॅकमेल करत असल्याचा दावा नेयमारच्या वडिलांनी केला.

ब्राझीलमध्ये राहाणाऱ्या या महिलेची नेयमारसोबत इंस्टाग्रामवर ओळख झाली आणि त्याचे मैत्रीत रुपांतर झाले. त्यानंतर हे दोघेही एकमेकांना मॅसेज पाठवू लागले. एक दिवस नेयमारने पॅरिसमध्ये सोबत येण्यास सांगितले आणि महिलेनेही होकार दिला. तेथे नेयमार मद्यधुंत अवस्थेत हॉटेलमध्ये आला आणि बोलताबोलता तो चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करू लागला. विरोध केल्यानंतर त्याने मारहाण केली आणि त्यानंतर बलात्कार केला, असा आरोप महिलेने केला.

नेयमारच्या वडिलांनी सांगितले की,''हे सत्य नाही. नेयमारने कोणताही गुन्हा केलेला नाही. त्या महिलेसोबत नेयमार एकदा डेटवर गेला होता, पण त्यानंतर तो तिला भेटला नाही. ही महिला पैशांसाठी नेयमारला फसवत आहे. ती आमच्या कुटूंबालाही ब्लॅकमेल करत आहे.''  
 

Web Title: Brazilian football star Neymar accused of raping woman in Paris hotel, claim media reports