सर्व महिला फुटबॉलपटूंसाठी बाला प्रेरणादायी : प्रफुल्ल पटेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2020 00:40 IST2020-05-17T00:39:37+5:302020-05-17T00:40:19+5:30

मणिपूरच्या या स्ट्राईकरचा रेंजर्ससोबत व्यावसायिक करार आहे. विदेशी लीग खेळणारी ती पहिली भारतीय महिला फुटबॉलपटू आहे.

Bala inspires all women footballers: Praful Patel | सर्व महिला फुटबॉलपटूंसाठी बाला प्रेरणादायी : प्रफुल्ल पटेल

सर्व महिला फुटबॉलपटूंसाठी बाला प्रेरणादायी : प्रफुल्ल पटेल

नवी दिल्ली : अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी भारतातील महिला फुटबॉलपटूंना बाला देवीकडून प्रेरणा घेण्याचा सल्ला दिला. बाला देवीने स्कॉटिश लीग क्लब रेंजर्सतर्फे शानदार कामगिरी केली आहे.
मणिपूरच्या या स्ट्राईकरचा रेंजर्ससोबत व्यावसायिक करार आहे. विदेशी लीग खेळणारी ती पहिली भारतीय महिला फुटबॉलपटू आहे.
प्रत्येक वयोगटातील संघांसोबत आॅनलाईन बातचीत करताना पटेल यांनी बाला देवीला म्हटले की, ‘आम्हाला तुझ्या कामगिरीचा अभिमान आहे. तू आगामी पिढीला मार्ग दाखविला असून महिला फुटबॉलपटू कुठेच कमी नाही, हे सिद्ध केले आहेस.’

Web Title: Bala inspires all women footballers: Praful Patel