शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
3
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
4
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
5
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
6
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
7
"ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी"; राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला 'मेसेज', मोरक्कोमध्ये काय बोलले?
8
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
10
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
11
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले
12
ब्रेकअपचं खोटं अन् हत्येनंतरचा बनाव...कानपूर सुटकेस 'कांड' प्रकरणात ट्विस्ट, २ आरोपींना अटक
13
Accident: पाण्याचा टँकर आणि दुचाकीत भीषण धडक; तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
14
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
15
VIRAL: रिक्षात बसलेल्या विदेशी तरुणाला रिक्षाचालकाने फ्रेंचमध्ये विचारला प्रश्न; त्यानंतर जे झालं ते...
16
'या' ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्सवर GST माफीचा फायदा नाही; आरोग्य विम्या कंपन्यांनी केलं स्पष्ट
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमात मराठी मालिकाविश्वातील 'या' अभिनेत्याची लागली वर्णी, स्वतः दिली माहिती
18
"पैसे कमावतो, टॅक्स भरतो; चोरी करत नाही...", तगड्या कमाईवरुन अक्षय कुमारचं स्पष्टीकरण
19
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
20
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार

खेळाडूंची शालीनता व शिस्त प्रभावित करणारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 00:54 IST

फिफा अंडर-१७ विश्वकप स्पर्धेच्या पहिल्या दिवशी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममधील माहोल स्वप्नवत होता. आम्ही मुंबईमध्ये राष्ट्रीय संघाच्या शिबिरात होतो आणि भारत-अमेरिका लढतीबाबत उत्साहित होतो.

गुरप्रीतसिंग संधू लिहितात...फिफा अंडर-१७ विश्वकप स्पर्धेच्या पहिल्या दिवशी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममधील माहोल स्वप्नवत होता. आम्ही मुंबईमध्ये राष्ट्रीय संघाच्या शिबिरात होतो आणि भारत-अमेरिका लढतीबाबत उत्साहित होतो. आम्ही सर्वांनी सोबत प्रोजेक्टरवर ही लढत बघितली. हे सर्व काही भारतात होत होते आणि सर्वत्र समाधानाचा माहोल होता. सर्वांनी युवा भारतीय खेळाडूंचा उत्साह वाढविला आणि त्यांच्यासाठी जल्लोष केला. शेवटी आम्ही केव्हापासून या संस्मरणीय क्षणाचे भागीदार होण्यास इच्छुक होतो. वैयक्तिक विचार करता आम्ही सर्व यात सहभागी झालो होतो. मी मैदानावर खेळत असल्याचे मला वाटत होते. आम्ही सर्व जण कुणाला पास द्यायला हवा, केव्हा कुठली रणनीती असावी, केव्हा एंड बदलावे, याबाबत चर्चा करीत होतो.मी यापूर्वीही म्हटले आहे, की गोलकीपर धीरज सिंगचे भविष्य उज्ज्वल आहे. मी त्याला यापूर्वीही खेळताना बघितले आहे. एक गोलकीपर म्हणून त्याने मोठी सुधारणा केली आहे. त्याने चांगली कामगिरी केली आणि काळानुरूप त्याच्यात आणखी सुधारणा दिसून येईल.एक गोलकीपर असल्यामुळे सांगू शकतो, की त्याच्यासाठी स्वत:ला अ‍ॅक्शनमध्ये ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे. तो ही कला जेवढ्या लवकर आत्मसात करेल तेवढे त्याच्यासाठी चांगले राहील. तुमच्याकडे येणारा पहिला चेंडू आत्मविश्वासाने पकडणे महत्त्वाचे आहे.या लढतीत समर्पणाची वृत्ती दाखविण्याचे श्रेय संघातील सर्व खेळाडूंना मिळायलाच हवे. भारतीय संघाच्या बचाव फळीने आत्मविश्वास कायम ठेवत हल्ले रोखण्याचा प्रयत्न केला. गरज भासली त्या वेळी धीरजने आपली भूमिका चोख बजावली. या वयात खेळाडूंना मैदानावर अमेरिकेसारख्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध शालीनता व शिस्तबद्ध कामगिरी करताना बघण्याचा अनुभवसुखद होता.निकालाचा विचार करता ०-३ हा स्कोअर भारतीय संघाची मैदानावरील कामगिरी दाखविणारा आहे, असे मला वाटत नाही. पण, आता पुढे बघण्याची व दडपण न बाळगता खेळण्याची वेळ आली आहे. आता प्रतिस्पर्धी म्हणून कोलंबिया संघ आहे. अन्य संघ तुलनेने वरचढ असले तरी उणिवा दूर करीत कडवे आव्हान दिले तर काहीही घडू शकते. सामन्यानंतर दुसºया दिवशी सकाळी स्वत:च्या खेळाचे विश्लेषण करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे खेळाडूंना आपण संघाला अधिक कशी मदत करू शकतो, हे समजण्यास मदत मिळते. दिग्गज संघ नेहमी असेच करतात. विशेषत: मैदानावर आपल्याविरुद्ध गोल कसा झाला, हे बघणे महत्त्वाचे असते. (टीसीएम)(लेखक यूएफा युरोपा कपमध्ये खेळणारा पहिला भारतीय फुटबॉलपटू आहे आणि भारतीय संघाचा उपकर्णधार आहे.’)

टॅग्स :2017 FIFA U-17 World Cupफिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017Footballफुटबॉल