२५ बेडरूमचे घर, खासगी जेट, १०० कोटी वेतन ...; नेमार उगीच सौदीला गेला नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 10:32 AM2023-08-18T10:32:52+5:302023-08-18T10:33:32+5:30

सौदी अरेबियातील सर्वात यशस्वी क्लब आहे. अल हिलाल नेमारला काय काय देणार?

25 bedroom house private jet 100 crore salary neymar junior go to saudi arabia | २५ बेडरूमचे घर, खासगी जेट, १०० कोटी वेतन ...; नेमार उगीच सौदीला गेला नाही

२५ बेडरूमचे घर, खासगी जेट, १०० कोटी वेतन ...; नेमार उगीच सौदीला गेला नाही

googlenewsNext

नवी दिल्ली : सौदी अरेबियात खेळायला जाणारा ब्राझीलचा फुटबॉलपटू नेमार ज्युनिअरने अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. सौदी अरेबियातील वास्तव्यादरम्यान नेमारला अशा सुविधा मिळणार आहेत, ज्या पाहून चाहत्यांचे डोळे विस्फारतील.

नेमार ज्युनिअरने पीएसजीला अलविदा केले आहे. ३१ वर्षांचा नेमार आता सौदी अरेबियाच्या अल हिलाल क्लबकडून खेळणार आहे. गेल्या वर्षी क्रिस्टियानो रोनाल्डोने युरोपचा क्लब सोडून सौदी अरेबियाच्या क्लबशी करार केला. तेव्हापासून दिग्गज फुटबॉलपटू सातत्याने सौदीकडे वळत आहेत. नेमारच्या आधी करीम बेंझेमा, साने, एन गोलो कांटे हे दिग्गज सौदी अरेबियात गेले.

नेमारचा पगार ९०० कोटी रुपये

अल हिलाल खेळताना नेमार ज्युनिअरला सुमारे ९०० कोटी रुपये दरवर्षी मिळतील. नेमारकडे पैशांसोबतच लोक ज्याचे स्वप्न पाहतात त्या सर्व लक्झरी सुविधा असतील. नेमार ज्या घरात राहणार आहे त्या घरात २५ खोल्या असतील. त्याला तीन गाड्या मिळतील, ज्यांची एकूण किंमत १५ कोटीपेक्षा जास्त आहे.

अल हिलाल नेमारला काय काय देणार?

१०० दशलक्ष युरो वार्षिक पगार २५ बेडरूमचे घर, ४० बाय १० मी. स्विमिंग पूल घरी, काम करण्यासाठी ५ लोक, बेंटले कॉन्टिनेंटल जीटी-एस्टन मार्टिन, डीबीएक्स लॅम्बोर्गिनी, हुराकन २४ तास ड्राइव्हर हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि त्यांच्या सुटीच्या कालावधीतील विविध सेवांची सर्व बिले क्लबकडे पेमेंटसाठी पाठवली जातील प्रवासासाठी खासगी विमान सोशल मीडियावर सौदी अरेबियाचा प्रचार करणाऱ्या प्रत्येक पोस्टसाठी ४.५ कोटी रुपये.

सौदीचा सर्वांत यशस्वी क्लब अल हिलाल

अल हिलाल हा सौदी अरेबियातील सर्वात यशस्वी क्लब आहे. या क्लबने सोंदी प्रो लीग ही तेथील प्रीमियर लीग विक्रमी १८ वेळा जिंकली आहे. अल हिलाल किंग कप विक्रमी १० वेळा, क्राउन प्रिन्स कप विक्रमी १३ वेळा, सुपर कप विक्रमी ३ वेळा, फेडरेशन कप विक्रमी ७ वेळा जिंकला आहे. अल हिलालने ४ वेळा एशियन चॅम्पियन्स लीगचे विजेतेपदही पटकावले आहे.

 

Web Title: 25 bedroom house private jet 100 crore salary neymar junior go to saudi arabia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.