शहरं
Join us  
Trending Stories
1
"सकाळी उठा, व्होटर डेलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
2
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
3
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
4
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
5
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
6
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
7
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
8
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
9
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
10
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
11
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
12
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
13
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
14
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
15
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
16
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
17
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
18
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
19
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
20
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल

जैवविविधतेशी आपला संबंध येतो कुठे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 16:09 IST

रानभाज्या हा आहार संस्कृतीचा एक भाग आहे. मात्र, जंगलांचा ऱ्हास होऊ लागल्याने ही आरोग्यदायी  संस्कृती लोप पावत चालली आहे. त्यामुळे आता रानभाज्यांच्या संरक्षण व संवर्धनाकडे लक्ष द्यायला हवे.

रेश्मा जठारपर्यावरण संशोधकजैवविविधतेशी आपला दररोज थेट संबंध येतो इतकंच नव्हे तर; ती आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य आणि मोठा भाग आहे. आपल्या आहाराचं उदाहरण घ्या. भारतात एकट्या तांदळाची जवळपास दहा हजार वाण होती. उंच वाढणारी, बुटकी, कमी मुदतीत तयार होणारी, जास्त मुदतीची, हळवी, गरवी, वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीत घेता येतील अशी इत्यादी अनेक. ही वाण आपल्या परिचयाची नसली तरी आजसुद्धा आपल्याला किमान एवढं नक्की ठाऊक असतं की काही तांदळाचा भात मोकळा होतो, काहीचा चिकट, काही दाणे लांब, काही आखूड, काही सुवासिक, पेजेचा तांदूळ वेगळा, पुलावाचा वेगळा, रोजच्या जेवणात करायचा भात घरोघरी वेगवेगळा. अर्थात आता आपल्या वापरात असलेली बरीचशी वाण ही संकरित असतात. आधुनिक नगदी शेतीच्या अट्टाहासामुळे कित्येक जुनी, नैसर्गिक वाण आता नमुन्यादाखलही मिळेनाशी झाली आहेत. 

आंब्यातील विविधतेच उदाहरण यापूर्वी पाहिले. जनुकीय विविधतेमुळेच आपल्याला नानाविध चवींचे आंबे खायला मिळतात. वेगवेगळ्या भाज्या, फळे प्रजाती वैविध्यामुळे मिळतात. दोडकी, घोसाळी, कारली, पडवळ दुधी, लाल भोपळा, कलिंगड या एकाच कुळातील वनस्पतींच्या विविध प्रजाती आहेत; ‘कुकुरबिटेसी’ असे या काकडीवर्गीय वनस्पतींच्या कुळाचे शास्त्रीय नाव आहे. याखेरीज अनेक पालेभाज्या... म्हणजे पालक, मेथी आदी बाजारात सहज मिळणाऱ्या पालेभाज्यांपेक्षा वेगळ्या अनेक भाज्या. पावसाळा आला आहे तेव्हा काही रानभाज्यांविषयी आपण लवकरच जाणून घेऊ किंवा उजळणी करू. पारंपरिक धान्ये, कडधान्ये, गळिताची धान्ये यातही देशाच्या विविध भागात केवढे तरी वैविध्य आढळते. तसेच, मसाल्याचे पदार्थ विसरून चालणार नाही.

तर, भाज्या, फळे, धान्य आणि ऋतुमानानुसार मिळणारे, उपलब्धतेनुसार केले जाणारे इतरही खाद्यपदार्थ माणसाच्या पारंपरिक जीवनशैलीतील आहारात रुचिपालट करत आले आहेत. आपली वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृती परिसंस्था, प्रजाती आणि जनुकीय अशा सर्व प्रकारच्या जैवविविधतेच्या आधारे साकारली आहे.

तरीदेखील, आपल्या आहारात आता आढळणारी विविधता ही फारच कमी झाली आहे. हे तपासून पाहायचे असेल तर एक लहानसा प्रयोग करून पाहा. आपल्या घरात, शेजारीपाजारी, मित्रमंडळात वेगवेगळ्या वयोगटातील, विशेषतः साठीच्या घरात व त्यापलीकडे असलेल्या पिढीतील माणसे गाठा आणि त्यांना त्यांच्या बालपणीच्या खाद्यपदार्थांच्या आठवणींबद्दल विचारा. नवी माहिती मिळेल आणि गप्पाही छान होतील! 

आहाराखेरीज माणूस वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजांसह सौंदर्य प्रसाधने, औषधे इ. नानाविध गरजांसाठी  जैवविविधतेवर अवलंबून आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या वापरात असलेल्या प्रत्येक वस्तूचा स्रोत पाहा, तिच्या निर्मितीसाठी वापरलेला प्रत्येक घटक पदार्थ जाणून घ्या. आपोआपच तुमच्या लक्षात येईल, आपला जैवविविधतेशी संबंध आणखी कुठेकुठे व कसा येतो!

टॅग्स :vegetableभाज्याfoodअन्न