शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसंचारी ‘भुट्टा’ नेमका कुठला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 05:59 IST

Food: दणदणत्या पावसात शेगडीवर खरपूस भाजलेलं, वर तिखट-मीठ भुरभुरवून, लिंबू पिळलेलं मक्याचं गरमागरम कणीस खाण्याची मजा काही और. नाही तर निदान उकडलेलं कणीस, गेला बाजार पॉपकॉर्न.

- मेघना सामंत(लेखिका खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)askwhy.meghana@gmail.com

दणदणत्या पावसात शेगडीवर खरपूस भाजलेलं, वर तिखट-मीठ भुरभुरवून, लिंबू पिळलेलं मक्याचं गरमागरम कणीस खाण्याची मजा काही और. नाही तर निदान उकडलेलं कणीस, गेला बाजार पॉपकॉर्न. सर्वात भारी म्हणजे इंदोरी ‘भुट्टे का कीस’ आणि पंजाबची खासियत ‘मक्की की रोटी’ कशी विसरता येईल? भारतात ठायीठायी मका आहे.दर्यावर्दी ख्रिस्तोफर कोलंबसने १४९२ साली केलेल्या युरोप ते अमेरिका या समुद्रसफरीला अन्नाच्या इतिहासात फार महत्त्व आहे. या प्रवासाच्या आधीचा आणि त्यानंतरचा असे दोन कालखंड स्पष्ट वेगळे दिसतात इतकं जबरदस्त स्थित्यंतर कोलंबसाने घडवलं. युरोपला बटाटे, टोमॅटो, मका, शेंगदाणे, मिरच्या, चॉकलेट, आणखीही बरंच काही…तसंच अमेरिकेला गहू, तांदूळ, ऊस, केळी अशा पिकांचा परिचय कोलंबसाने करून दिला; हे सगळं त्याने आधी ठरवलं नव्हतं, पण त्याच्या सफरीतून प्रेरणा घेऊन अनेक प्रवाशांकडून ते होत गेलं. याला ‘कोलंबियन एक्सचेंज’ असं म्हणतात. मका उगवायचा अँडीज पर्वताच्या पायथ्याशी. दक्षिण अमेरिकेत. तिथून तो हजारो वर्षांपूर्वी उत्तर अमेरिकेत पोहोचला. तिथले मूळ रहिवासी जमीन न नांगरताच त्याचं पीक घ्यायचे. नैसर्गिकरीत्या त्याची नवीन वाणं तयार होत गेली, जी कोलंबियन एक्सचेंजमार्फत युरोपात आणि पोर्तुगीजांमार्फत भारतात शिरली.मका रुजला शेतात, आहारातही. हिमालयाच्या रांगांपासून दक्षिण भारतापर्यंत सर्वसंचारी आहे तो. आपल्याकडे ऋषीपंचमीच्या भाजीतही घालतात; पण वनस्पतीशास्त्रज्ञांच्या मते तो जेमतेम चारशे वर्षांपूर्वीचा, तोही परकीयांकडून आलेला. आता यात एक गंमत आहे. अन्नाचा पुरातत्त्वीय अंगाने वेध घेणारे संशोधक म्हणतात की मका कधीपासून आपल्याकडे होता ! पुरावे आहेत. कर्नाटकातल्या काही (बेलूर इ.) दगडी देवालयांमध्ये मक्याची कणसं शिल्पित झालेली आढळतात. हुबेहूब. या शिल्पांचं वय आठशे-साडेआठशे वर्षं. म्हणजे कोलंबसाच्या देशाटनाच्याही कित्येक शतकं आधीच. शिवाय ‘मका’ हे नाव संस्कृत ‘महाकाय’ या शब्दावरून पडलं अशीही उत्पत्ती सांगतात. तर संशोधनाच्या क्षेत्रात मक्याच्या भारतीयत्वावरून तावातावाने वाद चालू असतो. कणसावर ताव मारताना तोंडी लावायला छान असतो तो.  (पूर्वार्ध)

टॅग्स :foodअन्न