असे करा झटपट होणारे पोह्यांचे कुरकुरीत कटलेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 17:07 IST2018-10-01T17:05:32+5:302018-10-01T17:07:32+5:30
हे कटलेट कमी तेलात आणि पोटभरीचे म्हणून खाता येतात.

असे करा झटपट होणारे पोह्यांचे कुरकुरीत कटलेट
पुणे : पोह्यांचे कटलेट हा घरात उपलब्ध असणाऱ्या पदार्थांमधून झटपट तयार होणारा, खुसखुशीत आणि स्वादिष्ट पदार्थ आहे. हे कटलेट कमी तेलात आणि पोटभरीचे म्हणून खाता येतात. मुख्य म्हणजे थंडही चांगले लागत असल्यामुळे डब्यात नेणेही शक्य आहे. त्यामुळे लहानांसह मोठ्यांनाही आवडणारे हे कटलेट नक्की करून बघा.
साहित्य :
पोहे एक मोठी वाटी
बटाटा : एक मध्यम उकडून किंवा चार ब्रेड
तांदुळाचे पीठ किंवा कॉर्नफ्लोअर (मक्याचे पीठ)
लसूण, आल्याची पेस्ट , एक चमचा
मिरची बारीक चिरलेली
लिंबू रस एक चमचा
कोथिंबीर
मीठ
तेल
कृती :
- पोहे भिजवून पाणी काढून घ्या. त्यात एक बटाटा कुस्करून घाला. बटाटा नसल्यास चार ब्रेड स्लाईसच्या कडा काढून घ्याव्यात. हा ब्रेड पाण्यात भिजवून पिळून काढावा. हा ब्रेड किंवा बटाटा आणि पोहे एकत्र मळण्यास सुरुवात करावी.
- त्यात एक मोठा चमचा तांदुळाचे पीठ कॉर्न फ्लोअर घालावे. त्यावर मीठ, कोथिंबीर, आलं-लसूण पेस्ट, लिंबू रस घालून एकजीव करून घ्यावे.
- हे मिश्रण जास्तीत जास्त मळावे. त्यामुळे कटलेट चवदार होतात.
- या मिश्रणाचे एकसारखे गोळे करून चपटे करून घ्यावेत.
- गॅसवर तेल तापवून मध्यम आचेवर टाळावेत आणि सॉससोबत सर्व्ह करावेत.
- हे कटलेट पॅनमध्ये तेल घेऊन शॅलो फ्राय केले तरी उत्तम लागतात.