पुण्यातील हे सहा स्पाॅट्स फेमस आहेत कचाेरी चाटसाठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 14:57 IST2019-04-04T14:57:02+5:302019-04-04T14:57:59+5:30

तुम्हाला काहीतरी चटपटीत खायचंय तर मग पुण्यातील या सहा स्पाॅट्सला नक्की भेट द्या.

These six Spots are famous for kachori chat in pune | पुण्यातील हे सहा स्पाॅट्स फेमस आहेत कचाेरी चाटसाठी

पुण्यातील हे सहा स्पाॅट्स फेमस आहेत कचाेरी चाटसाठी

पुणे :तुम्हाला काहीतरी चटपटीत खायचंय तर मग पुण्यातील या सहा स्पाॅट्सला नक्की भेट द्या. इथे तुम्हाला मिळेल चटपटीत असा कचाेरी चाट. त्यामुळे या ठिकाणांचा नक्की विचार करा. 

तात्याे, डेक्कन जिमखाना
पुण्यात मिळणाऱ्या सर्वाेेत्तम कचाेरी पैकी एक येथे तुम्हाला मिळेल. कचाेरीमध्ये तुम्हाला शेव आणि हिरवी चटणी टाकून दिली जाते. फर्ग्युसन रस्त्यावरील हा कचाेरीसाठीचा एक उत्तम ऑप्शन आहे. इथली सर्विस फारशी चांगली नसली तरी कचाेरीसाठी तु्म्ही नक्कीच या ठिकाणाला भेट देऊ शकता. 

शेगाव कचाेरी, कर्वेनगर 
कचाेरीचे नाव घेतले की शेगाव कचाेरीचीच आठवण येते. इथली कचाेरी ही फुगीर नाही तर काहीशी चपटी असते. त्यामुळे जर तुम्ही कचाेरी चाट खात असला तर तुम्हाला पपडी चाट खात असल्याचा फिल येईल. त्या जाेडीलाच हिरवी चटणी, कांदा आणि शेव असतेच. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत शेगाव कचाेरी ट्राय केली नसेल तर एकदा नक्की ट्राय करा. 

जलेबी जंक्शन, बाणेर 
बाणेर मधील जलेबी जंक्शन हा कचाेरी चाटसाठी एक फेमस स्पाॅट आहे. इथे क्रिस्पी कचाेरी तुम्हाला खायला मिळते.  इथली दही कचाेरी फेमस आहे. त्याचबराेबर येथे दही समाेसा सुद्धा उत्तम मिळताे. दही कचाेरीवर चाट मसाला, शेव, कांदा टाकून तुम्हाला दिलं जातं. त्यामुळे तुम्ही बाणेर भागात असाल तर हा तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. 

रिफरेशमेंट हाऊस, टिळक राेड 
पुण्यातील जुन्या खान्याच्या ठिकाणापैकी हे एक ठिकाण आहे. इथल्या पदार्थांना घरगुती स्वाद असताे. इथली कचाेरी आणि समाेसा थाेटा वेगळा दिसत असला तरी त्याची टेस्ट ही तुमच्या जिभेवर रेंगाळत राहते. इथे तुम्हाला कचाेरी साेबत सॅम्पल सुद्धा मिळते. त्याचबराेबर तुम्ही कचाेरीसाेबत दही सुद्धा ट्राय करु शकता. 

टेस्टी टंग चाट, बावधन
टेस्टी टंग चाट तुम्हाला पुण्यातील सर्वाेत्तम कचाेरी चाट देतं. इथली कचाेरी वेगळ्याच प्रकारची असते. तसेच इथला चाट सुद्धा फेमस आहे. त्यामुळे हा पर्याय सुद्धा तुमच्यासाठी उत्तम आहे. 

चाट बाझार, एफसी राेड 
एफसी राेडला विकेंडला गर्दी हाेते ती खरेदीसाठी. परंतु यातले अनेकजण हे खादाडीसाठी आलेले असतात. त्यातही चवदार चाटसाठी लाेकांची पसंती असते चाट बाझारला. इथला दिल्ली कचाेरी चाट आणि राज कचाेरी चाट हा खूप फेमस आहे. 

Web Title: These six Spots are famous for kachori chat in pune