उन्हाळ्यातही खा मका; फायदे ऐकून व्हाल चकित
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 17:43 IST2021-05-10T17:35:12+5:302021-05-10T17:43:59+5:30
मका म्हणजे खव्वयांसाठी जीव की प्राण. त्यातही मक्यापासून बनवल्या जाणाऱ्या पदार्थांचे विविध पर्याय सहज उपलब्ध असतात. तुमच्या आवडीचा मका तितकाच गुणकारी आहे हं. काय आहेत मक्याचे फायदे...

उन्हाळ्यातही खा मका; फायदे ऐकून व्हाल चकित
पावसाळ्याची चाहुल लागली की आठवतात गरमागरम मक्याची कणसं. पण मका फक्त पावसाळ्यातच खाल्ला जातो असे नाही. मौसम कोणताही असो मका हा कधीही स्वादिष्टचं लागतो. उलट उन्हाळ्यातही मका खाण्याचे अगणित फायदे असतात.
पचनशक्ती सुधारते
मक्यात भरपूर प्रमाणात फायबर असते. त्यामुळे पचनशक्ती सुधारण्यास याचा फायदा होतो. तसेच पित्त, बद्धकोष्ठता आणि पचनसंस्थचे इतर विकार होत नाहीत.
कॉलेस्ट्रॉल कमी करते
मक्यातील फायबरमुळे शरीरातील बॅड कॉलेस्ट्रॉल कमी राहते. तसेच यातील जीवनसत्वांमुळे नवीन पेशी तयार होतात.
रक्तातील शर्करा प्रमाणात राहते
मक्यात कॉर्नस्टार्च असते. त्यामुळे रक्तातील शर्करा नियंत्रणात राहते. त्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो.
त्वचा चमकदार होते
मक्याच्या सेवनाने त्वचेला भरपूर फायदा होतो. यामध्ये बेटा कोरोटीन असते जे त्वचा आणि डोळ्यांचे स्वास्थ्य उत्तम राखते.
अॅनिमिया दुर ठेवण्यास मदत
मक्यामध्ये लोह भरपूर प्रमाणात असल्याने अॅनिमियापासून बचाव होतो. यात फॉलिक अॅसिड व बी १२ जीवनसत्व असते. त्यामुळे शरीरात नव्या पेशींची वाढ होते.
अँटी एजिंग
मक्यात असलेल्या अँटीऑक्सिडंटमुळे अँटी एजिंगची (वय वाढल्यामुळे शरीरावर होणारे परिणाम, जसे चेहऱ्यावर सुरकुत्या येणे) समस्या दूर होते.
कॅन्सरला दूर ठेवतो
मक्यात फेनोलिक फ्लेवोनोइड अँटीऑक्सीडेंट असते ज्यामुळे कॅन्सरचा धोका दुर होतो, असा दावा केला जातो. याशिवाय यात फेरुलिक अॅसिड असते ज्यामुळे कॅन्सर शरीरापासून दूर राहतो.