शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
3
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
5
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
6
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
7
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
8
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
9
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
10
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
11
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
12
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
13
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
14
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
15
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
16
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
17
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
18
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
19
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
20
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'

अस्सल भारतीय केकची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2021 5:30 AM

भारतात अर्थातच ब्रिटिशांसोबत केकने शिरकाव केला. साम्राज्याच्या विस्ताराबरोबर ब्रिटिशांची केकची मागणी वाढली. ब्रिटिशांच्या बेकऱ्या सुरू झाल्या. मात्र भारतातला पहिला ख्रिसमस केक बनवण्याचं श्रेय केरळच्या बेकरीकडे जातं.

केकने माणसाला एवढी भुरळ पाडली की देशोदेशी तो शुभप्रसंगी करण्याचा पदार्थ म्हणून लोकप्रिय होत गेला. स्थानिक उपलब्धतेनुसार मलई, चीज, फळं इत्यादींची भर पडत गेल्याने केकच्या लक्षावधी पाककृती निर्माण झाल्या.भारतात अर्थातच ब्रिटिशांसोबत केकने शिरकाव केला. साम्राज्याच्या विस्ताराबरोबर ब्रिटिशांची केकची मागणी वाढली. ब्रिटिशांच्या बेकऱ्या सुरू झाल्या. मात्र भारतातला पहिला ख्रिसमस केक बनवण्याचं श्रेय केरळच्या बेकरीकडे जातं. तलाश्शेरी नावाच्या किनारी गावात १८८० साली माम्बळ्ळी बापू नावाच्या उद्योगी गृहस्थाने पहिली देशी बेकरी सुरू केली. बेकिंगची कला ते ब्रह्मदेशात शिकले होते. आपल्या ‘रॉयल बिस्किट फॅक्टरी’मध्ये ते चाळीस प्रकारची बिस्किटं, ब्रेड, टोस्ट वगैरे भाजत असत; पण केक नव्हता भाजला कधी. अशात मरडॉक ब्राऊन नामक ब्रिटिश मळेमालक त्यांच्या दुकानी अवतरला. त्याने इंग्लंडहून एक ख्रिसमस केक आणला होता, तो नमुन्यादाखल खायला देऊन त्याने तस्साच केक बनवून दाखवणार का? असं बापूंना विचारलं. ब्राऊन स्वतः दालचिनीची लागवड करणारा. त्याने त्यांना पद्धत समजावली; सुका मेवा, कोको अशी सामग्री देऊ केली. परंतु बापूंचा स्वतःच्या कौशल्यावर विश्वास होता. आधी त्यांनी केकचं भांडं गावातल्या लोहाराकडून घडवून घेतलं. खास केरळातली वेलची, दालचिनी निवडून घेतली. केकचं मिश्रण मुरवण्यासाठी ब्राऊनने सुचवलेली फ्रेंच ब्रँडी न वापरता माम्बळ्ळी बापूंनी चक्क वापरली काजूची फेणी. त्यांनी ख्रिसमसच्या चार दिवस आधी हा केक ब्राऊनसमोर पेश केला. अस्सल भारतीय चवीचा तो केक चाखताच ब्राऊन वेडा झाला. त्याने ताबडतोब वीस केक्सची मागणी नोंदवली. रॉयल बिस्किट फॅक्टरीचं नाव सर्वतोमुखी झालं. केकचं समीकरण भारतात तरी सुरुवातीला ख्रिश्चन धर्माशी जुळलेलं होतं; पण हळूहळू सर्वांनी त्याला स्वीकारलं. या केकच्या कृतीमध्ये आणखी एक भारतीय आविष्कार घडून आला, तो म्हणजे बिनअंड्याचा केक. दही, यीस्ट, मार्जरीन अथवा अधिक मात्रेत बेकिंग पावडर, कधी साय, दूध, कंडेन्स्ड मिल्क असे पर्याय वापरून एतद्देशीयांनी केकला एक नवा साज चढवला. ज्यामुळे, अधिकाधिक भारतीय लोकांना केक आपलासा वाटू लागलाय.- मेघना सामंत, (लेखिका खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)askwhy.meghana@gmail.com