बाळकैऱ्यांचं लोणचं बनवायची रेसिपी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2018 19:18 IST2018-06-01T19:18:16+5:302018-06-01T19:18:16+5:30
वडू आंबा लोणचं म्हणून बाजारात मिळणारं लोणचं बनवा घरच्या घरी.....

बाळकैऱ्यांचं लोणचं बनवायची रेसिपी
साहित्यः एक किलो अगदी छोट्या कैऱ्या, चवीनुसार मीठ, अंदाजे एक लीटर पाणी, अर्धी वाटी तिखट, पाव वाटी मोहरी, चमचाभर हिंग, पाव वाटी तिळाचं तेल.
कृतीः लोणचं करण्यापूर्वी दोन आठवडे कैऱ्या खारवून घ्याव्या. कैऱ्यांची बरणी उघडून त्यातील मिठाचं पाणी बाहेर काढून घ्यावं. त्यातलंच थोडंसं पाणी घेऊन त्यात तिखट भिजत घालावं. कढईत थोड्याशा तेलावर हिंग आणि मोहरी परतून घ्यावी व मिस्करमधून पूड करून घ्यावी. त्यात भिजवलेलं तिखट घालून पुन्हा वाटून घ्यावं. मग ते वाटण काढून घेतलेल्या मिठाच्या पाण्यात ओतून नीट एकत्र करून बरणीत कैऱ्यांवर ओतावं आणि नीट एकत्र करावं.
संकलनः उमेश कुलकर्णी