शहरं
Join us  
Trending Stories
1
"ते जिवंत असल्याचा कोणता पुरावाही नाहीये"; इम्रान खानचा मुलगा झाला भावूक, पाकिस्तान सरकारवर गंभीर आरोप
2
वॉशिंग्टनमध्ये गोळी लागलेल्या नॅशनल गार्डचा उपचारदरम्यान मृत्यू; दुसऱ्याची मृत्युशी झुंज!
3
सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात घसरण; रेड झोनमध्ये सेन्सेक्स, निफ्टी; Asian Paints, Max Health, Eicher टॉप लुझर्स
4
पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार! कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट होणार? जगप्रसिद्ध ब्रोकरेज फर्मचा मोठा दावा
5
९० रशियन जहाजांचा गुप्तपणे सागरी प्रवास, ३० जहाज भारतात पोहचले; खळबळजनक रिपोर्ट, नेमकं काय घडलं?
6
Crime: पुतळ्यावर अंत्यसंस्कार करून विम्याचे ५० लाख हडपण्याचा प्रयत्न; एका चुकीमुळे फसले!
7
VIDEO: दोस्तासाठी काहीपण... विराट कोहलीला हॉटेलवर सोडण्यासाठी खुद्द धोनीने चालवली कार
8
मुलींसाठी कमालीची आहे 'ही' स्कीम! केवळ व्याजातून होणार ₹४९ लाखांची कमाई, मॅच्युरिटीवर मिळतील ₹७२ लाखांचा फंड
9
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे काय होणार? आज ‘सर्वोच्च’ फैसला
10
"मविआ फुटणार… लागलेली घरघर आता अखेरच्या टप्प्यात आलीये", भाजप नेत्याचा ठाकरेंची शिवसेना, काँग्रेसवर बाण
11
आजचे राशीभविष्य, २८ नोव्हेंबर २०२५: संयम राखा आणि विचारपूर्वक व्यवहार करा!
12
VIDEO: धोनीच्या रांचीमधील आलिशन घरात जंगी पार्टी... विराट कोहली, ऋषभ पंतने लावली हजेरी
13
२ मोठे नेते, २ दावे...राज्यात २ डिसेंबरनंतर राजकीय भूकंप?; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू
14
पहाटे ५ वाजता शिंदेसेनेच्या आमदाराच्या घरी १०० पोलिसांची धाड; घराची झाडाझडती, भाजपावर आरोप
15
महाराष्ट्रासह १० राज्यांतील मेडिकल कॉलेजांवर ईडीचे छापे; ३६ जणांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
16
राज-उद्धव ठाकरे भेट, ‘शिवतीर्थ’वर बंद दाराआड २ तास चर्चा; एकजुटीने महायुतीला थोपवण्याचा निर्णय?
17
इमारतींच्या छतांवर आणि महामार्गावर आता ‘नो होर्डिंग्ज; मुंबई महापालिकेचे जाहिरात धोरण जाहीर
18
दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी हायकोर्टाचा पोलिसांना सवाल; "मृत्यूला ५ वर्ष झाली, आणखी किती..."
19
गुंगीचे औषध देऊन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; स्ट्रगलिंग मॉडेलला अटक, २ साथीदारांचा शोध सुरू
20
श्रेयवाद, आरोप प्रत्यारोप अन् ‘अरे’ला ‘कारे’ने उत्तर; सत्ताधारी भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष वाढला
Daily Top 2Weekly Top 5

कडू कारलेही वाटेल हवेहवेसे, अशी करा टेस्टी भाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 16:35 IST

कडू चव असूनही कारल्याची भाजी चवदार बनवणे शक्य आहे. तेव्हा अशी बनवा चवदार आणि पौष्टिक कारल्याची भाजी. 

 

पुणे : कारले म्हटले की लहानांपासून मोठेही नाक मुरडतात. पण आरोग्यासाठी प्रचंड हितकर असलेल्या कारल्याची भाजी आवर्जून खावी असे आहारतज्ज्ञ सांगतात. कडू चव असूनही कारल्याची भाजी चवदार बनवणे शक्य आहे. तेव्हा अशी बनवा चवदार आणि पौष्टिक कारल्याची भाजी. 

साहित्य :

  • कारले पाच ते सहा (हिरव्यागार रंगाची आणि मध्यम आकाराची कारली निवडावीत, ती कमी कडू असतात)
  • चिंचेचा कोळ पाव वाटी 
  • गुळ पाव वाटी 
  • चिरलेला कांदा एक वाटी 
  • लसूण पाच ते सहा पाकळ्या 
  • लाल तिखट 
  • गोडा  मसाला 
  • हळद 
  • मीठ 
  • कोथिंबीर 
  • तेल 

 

कृती :

  • कारल्याच्या आतील बिया काढून गोल चकत्या करून  घ्या. 
  • एका भांड्यात या चकत्या घेऊन त्यांना चमचाभर मीठ चोळून घ्या. 
  • आता मीठामुळे सुटलेले पाणी काढून टाका. 
  • उकळत्या पाण्यात या चकत्या सात ते आठ मिनिटे शिजवून पाणी काढून टाका. 
  • दुसऱ्या कढईत तेल तापवून त्यात मोहरी ताड्ताडवून घ्या. 
  • त्यात ठेचलेल्या लसूण पाकळ्या आणि कांदा गुलाबीसर परतवून घ्या. 
  • कांद्याचा रंग बदलल्यावर त्यात तिखट,गोडा मसाला आणि कारल्याच्या चकत्या टाकून एकजीव करा. 
  • त्यात चिंचेचा कोळ, गुळ घालून एकजीव करा. 
  • त्यात वाटीभर पाणी घालून शिजवा आणि थोडा रस्सा शिल्लक असताना गॅस बंद करा. 
  • कोथिंबीर घालून गरमागरम भाजी सर्व्ह करा. 
टॅग्स :Receipeपाककृतीvegetableभाज्याHealthआरोग्य