हॉटेलपेक्षा टेस्टी आणि भारी ; तवा पुलाव बनवा घरच्या घरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 17:07 IST2020-02-17T16:59:27+5:302020-02-17T17:07:15+5:30
घरातल्या लहानांपासून मोठ्यांना आवडणाऱ्या तवा पुलावची ही खास रेसिपी. या पदार्थात अनेक भाज्याही वापरत असल्याने तो पूर्ण अन्न किंवा फुल मिल म्हणूनही खाता येऊ शकतो. घरच्या घरी आणि कमीत कमी वेळेत बनणारी ही रेसिपी.

हॉटेलपेक्षा टेस्टी आणि भारी ; तवा पुलाव बनवा घरच्या घरी
घरातल्या लहानांपासून मोठ्यांना आवडणाऱ्या तवा पुलावची ही खास रेसिपी. या पदार्थात अनेक भाज्याही वापरत असल्याने तो पूर्ण अन्न किंवा फुल मिल म्हणूनही खाता येऊ शकतो. घरच्या घरी आणि कमीत कमी वेळेत बनणारी ही रेसिपी.
साहित्य :
एक कप बासमती तांदूळ
दोन कप पाणी
बटर १ चमचा
चार मिरे, चार लवंगा, एक तमालपत्र
पावभाजी मसाला एक टी स्पून
बिर्याणी मसाला एक टी स्पून
भाज्या :
कांदा उभा चिरलेला एक
बटाटा उकडलेला एक (लहान आकार )
उभी चिरलेली सिमला मिरची दोन
गाजर पाव कप उभे चिरून
वाफवलेले मटार पाव कप
आलं, लसूण पेस्ट एक चमचा
मीठ
तेल किंवा तूप
कोथिंबीर
कृती :
- पाणी उकळत ठेवा.
- कुकरमध्ये बटर घेऊन त्यात मिरे, तमालपत्र, लवंग परतून घ्या.
- आता त्यात धुवून निथळलेले तांदूळ घाला आणि मीठ घालून ते एखादा मिनिट परतून घ्या,
- तांदूळ परतल्यावर त्यात पाणी घाला आणि दोन शिट्ट्या घेऊन गॅस बंद करा.
- गॅस बंद केल्यावर अगदी दोन मिनिटात शिट्टी करून भात परातीत पसरवून घ्या
- आता मोठ्या तव्यावर किंवा कढईत तेल किंवा तूप किंवा बटर घ्या.
- त्यात आलं, लसूण पेस्ट आणि कांदा परतून घ्या. आता त्यात उर्वरित भाज्या परतवून घ्या.
- भाज्या अर्धवट शिजवल्यावर त्यात बिर्याणी मसाला, पावभाजी मसाला घालून एकजीव करा.
- चवीपुरते मीठ घाला. (भातात मीठ आहेच)
- सगळ्यात शेवटी भात टाकून हलवून घ्या.
- शिते मोडणार नाहीत याची काळजी घ्यावी, हलक्या हाताने किंवा दोन चमच्यांनी परतावे.
- दणदणीत वाफ आणून कोथिंबीर घालावी आणि सर्व्ह करा तवा पुलाव.