recipe of Bajra Vade | खरपूस बाजरी वडे मस्त ; मिनिटांत बनतील आणि क्षणात होतील फस्त 

खरपूस बाजरी वडे मस्त ; मिनिटांत बनतील आणि क्षणात होतील फस्त 

पुणे : हिवाळ्यात अनेक ठिकाणी बाजरीच्या भाकरी केल्या जातात. पण त्याहीपेक्षा अधिक चवदार आणि झणझणीत बाजरीच्या वड्यांची पाककृती आम्ही तुमच्याशी शेअर करत आहोत. घरच्या घरी आणि अगदी कमी वेळात होणारे हे वडे सगळ्यांना नक्की आवडतील असेच आहेत. 

साहित्य :

२ वाट्या बाजरीचे पीठ 

अर्धी वाटी बेसन पीठ 

मिरची, लसूण आणि जिऱ्याचा ठेचा 

कोथिंबीर अर्धी वाटी 

गरम पाणी 

तीळ

तेल 

हळद 

मीठ 

कृती :

कोमट पाण्याचा वापर करून सर्व पीठ आणि साहित्य एकत्र करून घट्ट पीठ मळून घ्यावे. 

२० मिनिटांनंतर या पीठाचे चपटे गोळे करावेत. गोळे करताना तेलाचा हात लावावा. 

हे गोळे टाळण्याआधी त्यांना तीळात घोळवून घ्यावे. म्हणजे वडे खरपूस होतात. 

नसेल आवडत तर तीळ पिठातही घालता येतील. 

हे वडे गरमच खावेत. सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत छान लागतात. 

हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, तीळ, लसूण आणि शेंगदाणे घालून हिरवी चटणी करता येईल. 

Web Title: recipe of Bajra Vade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.