झटपट फस्त होईल असा ब्रेडचा उत्तप्पा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 19:54 IST2018-12-19T19:51:48+5:302018-12-19T19:54:29+5:30
उद्या सकाळी नाश्त्यासाठी काय? हा प्रत्येक गृहिणीला पडलेला कॉमन प्रश्न. अशातच घरातल्यांच्या अपेक्षा तर संपण्याचं नावचं घेच नाहीत. नाश्त्याच्या त्याच त्याच पदार्थांऐवजी थोडेशे वेगळे पदार्थ करण्याचा विचार अनेक जणींचा असतो.

झटपट फस्त होईल असा ब्रेडचा उत्तप्पा!
उद्या सकाळी नाश्त्यासाठी काय? हा प्रत्येक गृहिणीला पडलेला कॉमन प्रश्न. अशातच घरातल्यांच्या अपेक्षा तर संपण्याचं नावचं घेच नाहीत. नाश्त्याच्या त्याच त्याच पदार्थांऐवजी थोडेशे वेगळे पदार्थ करण्याचा विचार अनेक जणींचा असतो. पण अशातच थोडासा हटके पदार्थ करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ब्रेड उत्तप्पा ट्राय करू शकता. झटपट तयार होणारा आणि चवीलाही मस्त असणारा हा उत्तप्पा सर्वांना नक्कीच आवडेल.
साहित्य :
- ब्रेडच्या सहा स्लाईस
- 3 चमचे जाडा रवा
- 3 चमचे तांदळाचे पीठ
- 3 चमचे मैदा
- अर्धी वाटी दही
- मीठ चवीनुसार
- जिरे
- काळी मिरी पूड
- 1 वाटी बारीक चिरलेला टोमॅटो
- एक किसलेले गाजर
- 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
- तेल
कृती :
- ब्रेडच्या कडा काढून स्लाईसचे तुकडे करुन मिक्सरमध्ये टाका. ब्रेडच्या तुकड्यांसोबत मिक्सरमध्ये तांदळाचे पीठ, मीठ, दही आणि पाणी घालून मिश्रण एकत्र करून पेस्ट तयार करा.
- तयार पेस्टपासून उत्तप्यासाठी पीठ पुन्हा थोडे पाणी घालून चांगले एकत्र करून पीठ तयार करा.
- मिश्रणामध्ये जिरे, बारीक चिरून ठेवलेले टोमॅटो, किसलेले गाजर, किसलेले आले, बारीक चिरून ठेवलेल्या हिरव्या मिरच्या व कोथिंबीर घालून मिक्स करून घ्या.
- गॅसवर मध्यम आचेवर तवा गरम करून घेऊन त्यावर चमच्याने थोडेसे तेल सोडून ते तव्यावर सगळीकडे पसरवून घ्या.
- पीठ तव्यावर घालून सगळीकडे गोल फिरवत पसरून घ्या. चमच्याने उत्तप्याच्या सगळ्या कडेने तेल सोडा व दोन मिनिटे भाजून घेऊन पलटी करा व दोन्ही बाजूंनी गोल्डन ब्राऊन रंगावर उत्तप्पा भाजून घ्या.
- खोबर्याची चटणी किंवा कोथिंबीरीची हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर गरम उत्तप्पा सर्व्ह करा.