पिस्ता खाण्याचे हे फायदे ऐकून तुम्हीही व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 03:59 PM2019-10-25T15:59:07+5:302019-10-25T15:59:47+5:30

ड्रायफ्रुट्स म्हटलं की, त्यामध्ये बदाम, काजू, अक्रोड यांसारख्या पदार्थांसोबतच पिस्त्याचाही समावेश होतो. पिस्ता चविला उत्तम ठरतो, पण याचे इतर फायदे ऐकल्यानंतर तुम्हाला हा आणखी आवडेल.

Pista health benefits in marathi health benefits of pistachios | पिस्ता खाण्याचे हे फायदे ऐकून तुम्हीही व्हाल अवाक्...

पिस्ता खाण्याचे हे फायदे ऐकून तुम्हीही व्हाल अवाक्...

googlenewsNext

ड्रायफ्रुट्स म्हटलं की, त्यामध्ये बदाम, काजू, अक्रोड यांसारख्या पदार्थांसोबतच पिस्त्याचाही समावेश होतो. पिस्ता चविला उत्तम ठरतो, पण याचे इतर फायदे ऐकल्यानंतर तुम्हाला हा आणखी आवडेल. हिरव्या रंगाचा पिस्त्यामध्ये फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन सी, झिंक, कॉपर, पोटॅशिअम, आयर्न, कॅल्शिअम आणि इतर अन्य पोषक तत्व आहेत. यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राखण्यास मदत होते. जाणून घेऊया पिस्ता खाल्याने होणाऱ्या फायद्यांबाबत... 

पिस्ता खाण्याचे आरोग्यदायी फायदे : 

1. पिस्त्यामध्ये असलेलं फॅटी अ‍ॅसिड त्वचेमध्ये ग्लो वाढतो. त्यामुळे त्वचेचा नॅचरल ग्लो वाढविण्यास मदत होते. याव्यतिरिक्त शरीरासाठीही फायदेशीर ठरतं. 

2. सतत बसून टिव्ही पाहणं, तासन्तास कम्प्युटरवर काम करणं आणि वाढत्या वयानुसार डोळ्यांची दृष्टी कमकुवत होते. पिस्ता डोळ्यांचं आरोग्य राखण्यासाठी मदत करतो. 

3. हृदयाचं आरोग्य राखण्यासाठी पिस्ता अत्यंत फायदेशीर ठरतो. हृदयाचे आजाराने ग्रस्त असणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर ठरतं. हे कोलेस्ट्रॉल कमी करतं. यामध्ये असणारे गुणधर्म हृदयाचं आरोग्य राखण्यासाठी मदत करतात. 

4. चेहऱ्याचं सौंदर्य राखण्यासाठी पिस्ता गुणकारी ठरतो. हे एखाद्या नैसर्गिक औषधापेक्षा कमी नाही. वाढत्या वयाची लक्षणं रोखण्यासाठी आणि सुरकुत्या दूर करण्यासाठी पिस्ता अत्यंत फायदेशीर ठरतो. 

5. पिस्ता खाल्याने मेंदूचं आरोग्य राखण्यास मदत होते. काजू, बदाम पेक्षाही जास्त पौष्टिक असतो. यामुळे स्मरणशक्ती वाढविण्यास मदत होते. त्यामुळे मुलांना पिस्ता खाण्यासाठी देणं फायदेशीर ठरतं. 

6. डायबिटीज वाढण्यापासून रोखण्याचं काम करतो. यामध्ये फॉस्फरस मुबलक प्रमाणात असतं. ज्यामुळे साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

7. शरीरावर सूज आल्यास पिस्ताचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. यामध्ये असलेलं व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ई सूज दूर करण्यासाठी मदत करतं. 

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

Web Title: Pista health benefits in marathi health benefits of pistachios

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.