घरच्याघरी झटपट बनवा बेकरीसारख्या चॉकलेट चिप कुकीज, करा ट्राय ही रेसिपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 22:47 IST2021-06-28T22:46:19+5:302021-06-28T22:47:50+5:30

वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये बनणा-या या कुकीजची चव अप्रतिम असते. या मस्त कुरकुरीत कुकीज फक्त खुसखुशीतच नसतात तर त्या मऊशार देखील असतात. त्यामुळे या कुकीज तुम्ही जिभेवर ठेवताच अगदी काही क्षणात विरघळून जातात. चला तर जाणून घेऊया स्वादिष्ट आणि खुसखुशीत चोको चिप कुकीजची अगदी साधीसोपी रेसिपी!

Make homemade instant bakery-like chocolate chip cookies, try this recipe | घरच्याघरी झटपट बनवा बेकरीसारख्या चॉकलेट चिप कुकीज, करा ट्राय ही रेसिपी

घरच्याघरी झटपट बनवा बेकरीसारख्या चॉकलेट चिप कुकीज, करा ट्राय ही रेसिपी

सध्या लॉकडाऊन सुरु आहे आणि करोनामुळे बाहेरचे पदार्थ खाण्यास बंदी देखील आहे. तर अशा या परिस्थितीमध्ये घरच्या घरी तुम्ही कुकीज बनवून त्याचा आनंद लुटू शकता. वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये बनणा-या या कुकीजची चव अप्रतिम असते. या मस्त कुरकुरीत कुकीज फक्त खुसखुशीतच नसतात तर त्या मऊशार देखील असतात. त्यामुळे या कुकीज तुम्ही जिभेवर ठेवताच अगदी काही क्षणात विरघळून जातात. चला तर जाणून घेऊया स्वादिष्ट आणि खुसखुशीत चोको चिप कुकीजची अगदी साधीसोपी रेसिपी!
महत्त्वाची सामग्री
1 कप पावाचे पीठ
6 चमचे पिठीसाखर
5 चमचे वितळलेले बटर
3 चमचे चॉकलेट चिप्स
1.2 चमचे बेकिंग सोडा
1 चमचे बेकिंग पावडर
1 चमचे दूध
1.2 चमचे व्हेनिला एसेंस

एका बाऊलमध्ये बटर आणि पिठीसाखर घेऊन सामग्री चांगली मिक्स करा. आता त्या मिश्रणात मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, व्हेनिला इसेंन्स, चॉकलेट चिप आणि दूध घाला. सर्व सामग्री व्यवस्थित मिक्स करुन त्याचा गोळा बनवा आणि हा गोळा मऊ बनेल याची काळजी घ्या. तयार झालेल्या पिठाचे गोल गोळे करुन त्याची छानशी पोळी लाटून घ्या. आता तुमच्या आवडच्या आकाराच्या कुकीज कटरच्या सहाय्याने पोळी कापून घ्या. पुढे १० मिनिटांसाठी ओव्हन चांगला गरम करुन घ्या. ओव्हन गरम झाल्यानंतर कुकीज भाजण्यासाठी १५ मिनिटे ओव्हनमध्ये ठेवा. तर अशारितीने आपल्या खुसखुशीत व स्वादिष्ट व्हॅनिला आणि चोको चिप कुकीज झाल्या आहेत तयार! याचा आपण संध्याकाळच्या गरमागरम चहासोबत किंवा कॉफीसोबत आस्वाद घेऊ शकता.

Web Title: Make homemade instant bakery-like chocolate chip cookies, try this recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.