उपवासाची साबुदाणा खिचडी मोकळी आणि मऊ होत नसेल तर काय कराल? वाचा या सोप्या टिप्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 18:38 IST2021-07-20T18:34:16+5:302021-07-20T18:38:40+5:30
उपवासाच्या दिवशी खाल्ली जाणारी साबुदाण्याची खिचडी तुमचा विकपॉईंट असले तर ती 'या' टिप्स नक्की फॉलो करा. बघा कशी खिचडी मऊ, लुसलुशीत आणि मोकळी होते.

उपवासाची साबुदाणा खिचडी मोकळी आणि मऊ होत नसेल तर काय कराल? वाचा या सोप्या टिप्स
उपवासाच्या दिवशी खाल्ली जाणारी साबुदाण्याची खिचडी तुमचा विकपॉईंट असले तर ती 'या' टिप्स नक्की फॉलो करा. बघा कशी खिचडी मऊ, लुसलुशीत आणि मोकळी होते.
साबुदाणा निवडताना
टपोरा, गोल दाणेदार साबुदाणा निवडावा. वेडावाकडा, हाताळल्यावर तुटणारा साबुदाणा घेऊ नये. घेतल्यास भाजून घ्यावा.
साबुदाणा भिजवताना
साबुदाणा चांगला दोन ते तीन वेळा पाण्याने नीट धुवून घ्या. साबुदाणा भिजवण्यासाठी उंच आणि झाकणवाला डबा निवडा. साबुदाणा पूर्ण भिजून वर जवळपास अर्धा सेंटीमीटर पाणी राहिल इतके पाणी घ्या. एका तासाने डबा उलटा करा म्हणजे वरून कोरडा पडणारा साबूदाणाही छान भिजतो. साबुदाणा कमीतकमी ४ ते ६ तास भिजवा.
शेंगदाणे वापरताना
शेंगदाणे नीट भाजून घ्या. शेंगदाणे अख्खे भाजून वापरले तरी चवीला चांगले लागतात. कुट केल्यास शेंगदाणे भाजूनच कुट करावे. सालासकट मिक्सरमध्ये भरड दळावी.
बटाट्याच्या फोडी
तुम्ही बटाट्याच्या फोडी आधी शिजवून घेऊ शकता. साबुदाण्या अगोदर जिरे, तूप आणि हिरव्या मिरच्या टाकून बटाटे शिजवून घ्यावेत.
तुपाचा वापर
वनस्पती तुपातील खिचडी साजूक तुपातील खिचडीपेक्षा जास्त खमंग लागते. यामागे कदाचित तुपाचा सढळ हस्ते वापर हे कारण देखील असू शकते.
खिचडी परत गरम करताना
खिचडी परत गरम करताना त्यावर दुधाचा किंवा ताकाचा हबका मारुन घ्यावा.