लॉकडाऊनमध्ये चविष्ट रेसीपीज बनवा; ट्राय करा तवा पिझ्झा वड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 18:34 IST2021-05-12T18:33:36+5:302021-05-12T18:34:32+5:30
तवा पिझ्झा वड्या या पिझ्झाच्या २०२१ मधला नवीन अवतार आहेत. यात तुम्हाला पिझ्झाची टेस्ट तर मिळतेच पण हा पदार्थ १० ते १५ मिनिटात तयार होतो.

लॉकडाऊनमध्ये चविष्ट रेसीपीज बनवा; ट्राय करा तवा पिझ्झा वड्या
लॉकऊनमुळे तुम्हाला बराच वेळ मिळाला असेल. खव्वयांसाठी लॉकडाऊन म्हणजे पर्वणीच. तुम्हाला खायला आणि खाऊ घालायला आवडत असेल तर या तव्वा पिझ्झा वड्या तुम्ही एकदा चाखुन पहाच.
तवा पिझ्झा वड्या या पिझ्झाच्या २०२१ मधला नवीन अवतार आहेत. यात तुम्हाला पिझ्झाची टेस्ट तर मिळतेच पण हा पदार्थ १० ते १५ मिनिटात तयार होतो.
साहित्य (पिझ्झा बेससाठी):
मैदा, मीठ, साखर, बेकींग सोडा, बेकिंग पावडर, तेल आणि दही
पिझ्झा बेस बवण्याची कृती :
प्रथम मैदा, मीठ, साखर, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर एकत्र करून घ्या.
त्यात दही टाका आणि छान मळून घ्या
त्यामध्ये तेल टाकून पुन्हा एकदा नीट मळून घ्या.
हे पीठ एका भांड्यामध्ये ५ मिनिटासाठी ठेवा.
पिझ्झा सॉस बनवण्याची कृती:
टॉमेटो केचअपमध्ये रेड चिलि फ्लेक्स, काळीमिरी पावडर आणि पिझ्झा सिझनिंग टाकून हे मिश्रण एकत्र करा.
पिझ्झा वड्या बनवण्याचे साहित्य :
पिझ्झा सॉस, शिमला मिर्ची, लाल आणि पिवळी मिर्ची, कांदा, चीज
पिझ्झा वड्या बनवण्याची कृती
प्रथम तयार केलेले पीठ चौकोनी आकारामध्ये थोडे जाडसर लाटून घ्या.
त्यावर पिझ्झा सॉस लावा, त्यावर चीझ किसून टाका
हिरवी आणि पिवळी मिर्ची कापून टाका
त्यानंतर शिमला मिर्ची आणि कांदा कापून टाका.
पुन्हा एकदा चीज पसरून घ्या
त्यावर पिझ्झा सॉस टाका
आता याचा व्यवस्थित रोल करून घ्या
अळूच्या वड्या ज्याप्रमाणे कापल्या जातात त्याचप्रकारे याही वड्या कापून घ्या.
तव्यावर ते टाका आणि फ्राय करा
झाल्या तुमच्या तवा पिझ्झा वड्या तयार.