शहरं
Join us  
Trending Stories
1
आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी; राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी, निवडणुकांची चाचपणी
2
PM मोदींचा स्वदेशी नारा; जनतेला पत्र; ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ बुलंद करण्यासाठी प्रयत्न करा
3
बाधित क्षेत्र ३ हेक्टर मानून मदत; राज्य सरकारचा निर्णय, पूरग्रस्त शेतकऱ्यांना होणार लाभ
4
अपात्र लाडक्या बहिणींनी उकळले १६४ कोटी रुपये, १२ हजारांवर पुरूष तर अपात्र महिला ७७ हजार
5
मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात ऐन दिवाळीत पावसाचा बार; पुढील तीन दिवस असेच वातावरण राहणार
6
उमेदवार जाहीर होताच महाआघाडीतील दरी स्पष्ट; राजद, काँग्रेस, डाव्या पक्षांनी केले दुहेरी अर्ज
7
बिहार निवडणूक २०२५: १२१ मतदारसंघांत एकूण १,३१४ उमेदवार; महिला मतदारांच्या आधारे ‘जदयु’ बळकट
8
“महाआघाडीला नव्हे, भाजप जनसुराजला घाबरतेय; आमचे उमेदवार फोडतेय”; प्रशांत किशोर यांचा आरोप
9
...तर H1B व्हिसाधारकांना वाढीव शुल्क लागणार नाही; पण वाढ कायम; ट्रम्प प्रशासनाकडून स्पष्टता
10
७ दिवसांत ३३ हजारांनी घसरला दर; लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर ८ हजारांनी गडगडली चांदी!
11
सर्व न्यायालयांमधील ‘सू’ व्यवस्था दयनीय; देशातील सर्व हायकोर्टांचा अहवाल सुप्रीम कोर्टात सादर
12
विभक्त पती, आईला फ्लॅटमध्ये राहण्यास हायकोर्टाची परवानगी; नेमके प्रकरण काय?
13
नवी मुंबई-पनवेलमध्ये आगीत ६ जणांचा मृत्यू; ठाण्यात एकाच दिवशी आगीच्या सहा घटना
14
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
15
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
16
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
17
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
18
Womens World Cup : लाजिरवाण्या पराभवासह पाक संघ OUT; सेमीसह फायनल भारतात खेळवण्याचा मार्ग मोकळा!
19
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
20
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा

मकर संक्रांतीला लाडू करण्याआधी गुळ चांगला की भेसळयुक्त कसं ओळखाल? वापरा ही आयडिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2021 19:14 IST

Food Tips in Marathi : तुम्ही वापरत असेल्या गुळ बनावट असेल तर याचा काहीही उपयोग होणार नाही. आज आम्ही तुम्हाला बनावट आणि चांगला गुळ कसा ओळखायचा याबाबत सांगणार आहोत. 

मंकर संक्रातीला अवघे काही दिवस उरले आहेत. घरोघरी लाडू तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे. अनेकांकडे मेथीचे लाडू वळून तयार सुद्धा झाले. तीळाचे लाडू असो किंवा मेथीचे सगळ्यात महत्वाचं म्हणजे  गुळ. गुळाचे शरीराला अनेक फायदे होतात म्हणून हिवाळ्याच्या दिवसात शरीराला पोषण मिळण्याठी अनेकजण पदार्थांमध्ये साखरेऐवजी गुळाचा वापर करतात. पण तुम्ही वापरत असेल्या गुळ बनावट असेल तर याचा काहीही उपयोग होणार नाही. आज आम्ही तुम्हाला बनावट आणि चांगला गुळ कसा ओळखायचा याबाबत सांगणार आहोत. 

बनावट गूळाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. कॅल्शियम कार्बोनेट आणि सोडियम बायकार्बोनेट सारखी घातक रसायने सहसा भेसळयुक्त गुळामध्ये मिसळली जातात. जी शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहेत. कॅल्शियम कार्बोनेट गुळाचे वजन वाढवण्यासाठी, तर सोडियम बायकार्बोनेटचा वापर गुळाला योग्य रंग देण्यासाठी वापरले जाते.

असं तपासून पाहा

दुकानातील गुळ पांढरा, हलका पिवळसर तर बनावट गूळाचा काही भाग हा लालसर असेल. जर आपण असा भेसळयुक्त गूळ पाण्यात ठेवाल तर  त्यातील भेसळयुक्त पदार्थ हे भांड्याखाली बसतील, तर चांगला गूळ पाण्यात पूर्णपणे विरघळेल. चांगल्या गुळाची निवड करताना त्याचा रंग  पाहणं गरजेचे असते. नेहमीच रंगाने तपकिरी असलेल्या गुळाची निवड करा

भेसळ झाल्यामुळे बनावट गूळ हा पिवळसर किंवा फिक्कट तपकिरी रंगाचा दिसतो. असा रंग असलेला गूळ निवडणे टाळा. ऊसाच्या रसातील अशुद्धतेमुळे आणि उकळल्यामुळे रासायनिक प्रक्रिया होऊन, गुळाचा रंग गडद लाल किंवा तपकिरी होतो. यानंतर, त्यात काही नैसर्गिक गोष्टी मिसळून त्यातील अशुद्धता दूर केल्या जातात.

या पिवळ्या व स्वच्छ दिसत असलेल्या गुळात फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड रेग्युलेशन २०११ च्या कायद्यानुसार गुळात जास्तीत जास्त ७० पीपीएम इतके सल्फर डाय आॅक्साईड वापरण्याची परवानगी आहे.  रसायनाचा अधिक वापर केल्याने अनेक जीवघेणे आजार होण्याची शक्यता असते. यामुळे रसायनाचा वापर न करता सेंद्रीय पद्धतीने गूळ तयार करणे आरोग्यासाठी फायद्यासाठी ठरते. मात्र, फायदा  मिळवण्यामुळे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे जाणवत असल्याचा आरोप ग्राहक करतात. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सfoodअन्नHealthआरोग्य