नारळातील मलाई अनेकदा खाल्ली असेल, पण हे फायदे माहीत आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2019 10:48 AM2019-07-09T10:48:26+5:302019-07-09T10:56:53+5:30

नारळाचं पाणी सेवन करण्याचे फायदे तुम्हाला नक्कीच माहीत असतील. पण अनेकजण नारळातील पांढरी मलाई खात नाहीत. ते फेकून देतात.

Know eating benefits of coconut meat or naralachi malai | नारळातील मलाई अनेकदा खाल्ली असेल, पण हे फायदे माहीत आहे का?

नारळातील मलाई अनेकदा खाल्ली असेल, पण हे फायदे माहीत आहे का?

googlenewsNext

नारळाचं पाणी सेवन करण्याचे फायदे तुम्हाला नक्कीच माहीत असतील. पण अनेकजण नारळातील पांढरी मलाई खात नाहीत. ते फेकून देतात. नारळातील मलाईला कोकोनट मीट असंही म्हणतात. आज आम्ही तुम्हाला या मलाईचे फायदे सांगणार आहोत. कदाचित हे फायदे वाचल्यावर तुम्ही नारळातील मलाई कधी फेकणार नाही.

नारळातील मलाईमुळे शरीर हाटड्रेट ठेवण्यासाठी फार फायदेशीर असते. ही मलाई तुम्ही कच्ची किंवा शिजवूनही खाऊ शकता. तसेच यातून निघणाऱ्या दुधाचेही अनेक फायदे होतात. चला जाणून घेऊ नारळातील मलाईचे आरोग्यदायी फायदे...

(Image Credit : Ayur Times)

फॅटी अ‍ॅसिड - नारळाचा हा पांढरा भाग फॅटी अ‍ॅसिडने युक्त आहे. तसेच खोबऱ्याचं सेवन केल्याने आपल्या शरीराचं मेटाबॉलिज्म मजबूत होतं. तसेच ही मलाई लगेच ऊर्जा देणाराही चांगला स्त्रोत आहे. याचं नियमित सेवन करणाऱ्या लोकांना सतत भूक लागत नाही. त्यामुळे तुमचं जास्त खाणं याने कंट्रोल होतं आणि तुमचं वजन वाढत नाही.

पोटावरील चरबी होते कमी - पोटावरील चरबी शारीरिक आरोग्यासाठी सर्वात हानिकारक आहे. लठ्ठपणामुळे तुम्ही अनेक आजारांचे शिकार होऊ शकता, त्यामुळे नारळातील मलाई फार उपयोगी ठरते. ही २०० ग्रॅम मलाई नियमित खाल्ल्याने कंबरेवरील आणि पोटावरील चरबी कमी करता येते. चांगल्या रिझल्टसाठी याचा वापर १२ आठवडे रोज करू शकता.

फायबर - नारळाच्या एक कप मलाईमध्ये ७ ग्रॅम फायबर असतं. त्यामुळे याने पचनक्रिया अधिक चांगली आणि मजबूत होते. तसेच फायबरयुक्त मलाईच्या सेवनाने पोटाच्या समस्याही दूर होतात. 

(Image Credit : The Statesman)

व्हिटॅमिन ई - नारळाच्या मलाईमध्ये कॅलरीज, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स भरपूर असतात. यात व्हिटॅमिन ई भरपूर असतं, जे त्वचेसाठी फार फायदेशीर ठरतं. तसेच या व्हिटॅमिन ई सोबतच व्हिटॅमिन सी, के आणि ए सुद्धा असतं. हे व्हिटॅमिन्स त्वचा, केस आणि डोळ्यांसाठी फायदेशीर असतं.

पोटॅशिअमने भरपूर असलेली मलाई - नारळाच्या मलाईमध्ये व्हिटॅमिन बी चे सर्व प्रकार असतात. सोबतच यात पोटॅशिअमही भरपूर प्रमाणात असतं. जे शरीराच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतं. आपल्या दैनंदिन जीवनासाठी आवश्यक पोटॅशिअमचं यात ७.५ टक्के प्रमाण असतं. त्यामुळे याचं सेवन फायदेशीर ठरतं.

Web Title: Know eating benefits of coconut meat or naralachi malai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.