(Image credit- medical news today)

हेल्दी आणि ग्लोईंग स्किनसाठी महिला वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करत असतात. पिंपल्सचा सामना करायचा नसेल तर सगळयात  जास्त प्रभावी ठरतात ते म्हणजे घरगुती उपाय. अनेकांना पार्लरना जाण्यासाठी वेळ मिळत नाही. तुमच्या बाबतीत सुद्धा असं होत असेल तर आज आम्ही तुम्हाला घरगुती वापरात सर्रास वापरल्या जात असलेल्या कोंथिबिरीबद्दल सांगणार  आहोत. कोथिंबिरीचा वापर जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो. परंतु, जेवणाचाी टेस्ट वाढवणारी ही कोथिंबिर औषधीदेखील आहे. आरोग्याच्या समस्यांसाठी तसंच त्वचा आणि केसांच्या समस्या कोथिंबिरीच्या वापराने तुम्ही  सोडवू शकता. 


त्वचेसाठी फायदेशीर

कोथिंबिरीमध्ये अँटी फंगल, अँसेप्टिक, डिटॉक्सीफाइड गुण असतात. त्यामुळे त्वचेशी संबंधित समस्या दूर होतात. खाज व पुरळची समस्या असल्यास कोथिंबिरीची पेस्ट लावावी. लगेच आराम मिळेल.  यामध्ये विटामिन सी असून तुमच्या फ्री रॅडिकल्सशी लढण्यास याची मदत होते  आणि एजिंगची लक्षणं दिसत असल्यास, यावर रोख लावण्यासही कोथिंबिरीची मदत होते. याशिवाय एक्झिमा आणि फंगल इन्फेक्शनसारख्या रोगांवरही कोथिंंबीर हा चांगला उपाय आहे.

डोळ्यांच्या समस्या

कोथिंबिरीच्या सेवनाने नजर चांगली होते. डोळ्यांसाठी हे एक उत्तम औषध आहे.कोथिंबिरीची पाने बारीक करून पाण्यामध्ये उकळून घ्यावीत. हे पाणी गाळून त्याचे काही थेंब डोळ्यात टाकल्यास डोळ्यातून पाणी येण्याची समस्या दूर होते.

पचनास उत्तम

पचनास उत्तम मदत करते , ताप आल्याने तोंडाला चव राहिली नसेल , सारखी तहान लागत असेल तर , भूक लागत नसेल तर धन्याचा काढा करून द्यावा उत्तम उपयुक्त ठरतो. उलट्या झाल्या असतील , अजीर्ण , पोटात दुखत असेल तर , मुळव्याध आणि जंत झाले असतील तर धन्याचे पाणी नियमित वापरात ठेवावे. पित्ताचा त्रास असल्यास कोथिंबिरीच्या पानांच्या रसाचे सेवन करावे.

पाळीच्या वेदना कमी करते

मासिक पाळीत अधिक रक्तस्त्राव होत असल्यास धणे पाण्यात टाकून उकळून घ्या. पाणी अर्ध झाल्यानंतर त्यात साखर मिसळून ते गरम पाणी प्या. फायदा होईल. अर्धा ग्लास पाण्यात दोन चमचे धणे टाकून पिल्यानं पोटदुखीचा त्रास कमी होतो. ( हे पण वाचा-डाग आणि पुळ्यांनी हैराण असाल, तर पार्लरशिवाय डॅमेज त्वचा डिटॉक्स करण्याची 'ही' ट्रिक वापरा!)

केसांच्या समस्यांवर उपाय

तुमच्या केसांसाठीही कोथिंबीर उपयुक्त आहे. कोथिंबिरीचा रस काढून तो केसांमध्ये लावा आणि मग ३०  मिनिट्स झाल्यावर केस धुवा. यामुळे तुमच्या केसांची गळती थांबेल. तसंच तुमचे केस जर कुरळे असतील आणि तुम्हाला ते स्ट्रेट करायचे असतील तर कोथिंबिरीची पेस्ट तुम्ही तुमच्या केसांना लावा आणि साधारण २ तास केस तसेच ठेवा आणि मग नेहमीप्रमाणे शँपूने केस धुवा. असं केल्यामुळे तुमचे केस आपोआप सरळ होतील. ( हे पण वाचा-ग्लुटेनयुक्त पीठ महिलांसाठी ठरतंय घातक; लग्न सुद्धा मोडतात, रिसर्चमधून धक्कादायक खुलासा)

Web Title: know about coriander health and skin benefit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.