बाजारातून कांदे आणल्यावर पस्तावण्याऐवजी आधीच घ्या 'ही' खबरदारी, टाळाल नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 20:13 IST2021-07-22T20:10:14+5:302021-07-22T20:13:47+5:30
कांद्याचा वापर आपण भाज्यांमध्ये करतोच करतो. सर्व घरांमध्ये कांदा वापरला जातो. त्यामुळे कांदे खरेदी करताना खबरदारी घ्यावी लागते. त्यामुळे कांदा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात घेणे जरुरीचे आहे हे पाहु.

बाजारातून कांदे आणल्यावर पस्तावण्याऐवजी आधीच घ्या 'ही' खबरदारी, टाळाल नुकसान
कांद्याचा वापर आपण भाज्यांमध्ये करतोच करतो. सर्व घरांमध्ये कांदा वापरला जातो. त्यामुळे कांदे खरेदी करताना खबरदारी घ्यावी लागते. त्यामुळे कांदा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात घेणे जरुरीचे आहे हे पाहु.
वासावरुन कांदा ओळखता येतो
कांदा खरेदी करताना त्याचा वास घ्या. कांद्यामधून दुर्गंधी येत असेल तर कांदा आतून सडलेला असण्याची शक्यता आहे. कांद्याचा वास कुजलेला असेल तर लगेच लक्षात येते की कांदा खराब आहे.
साल निघालेला कांदा घेऊ नका
साल निघालेला कांदा खरेदी करु नका. साल निघालेला कांदा लवकर खराब होतो. त्याची साठवणूक करणे कठीण होते. त्यामुळे साल निघालेला कांदा घेऊ नका.
कांद्याचे प्रकार
कांद्यांचे बरेच प्रकार असतात. केशरी साल असलेले कांदे गोड लागतात. आपल्याला सामान्य कांदे खायचे असतील तर आपण जांभळा किंवा गुलाबी रंगाचा कांदा खरेदी करा.
अंकुर फुटलेला कांदा घेऊ नका
कांद्याचा खालचा भाग पाहुन घ्या. जुन्या कांद्यामध्ये अंकुर यायला सुरुवात झालेली असते. असा कांदा आतून सडण्यासही सुरवात झालेली असते. म्हणून, कांदे खरेदी करताना, अंकुर फुटलेला कांदा घेऊ नका.
मध्यम आकाराचे कांदे घ्या
साधारणत: मध्यम आकाराचे कांदे निवडा. जर कांदा फारच लहान असेल तर सोलल्यानंतर लहान होतो. म्हणूनच मध्यम आकाराचे कांदे खरेदी करा. त्याच वेळी जुळलेले कांदे किंवा खूप मोठे कांदेही घेऊ नका.