अशाप्रकारे दूध उकळाल तर नाही पडणार भांड्याच्या बाहेर, फॉलो करा या साध्या टिप्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 19:04 IST2021-07-21T14:09:04+5:302021-07-21T19:04:11+5:30
दूध उतू जाऊ नये यासाठी महिलांना नेहमी काही ना काहीतरी शक्कल लढवावी लागते. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत अशा काही टिप्स शेअर करणार आहोत ज्यामुळे तुम्ही गॅसवर दूध गरम करताना निश्चिंत राहू शकता.

अशाप्रकारे दूध उकळाल तर नाही पडणार भांड्याच्या बाहेर, फॉलो करा या साध्या टिप्स
दूध गरम करताना गॅसजवळ थांबून ते उकळू लागताच लगेच गॅस बंद करावा लागतो. मात्र कामाच्या गडबडीत बऱ्याचदा गॅसवर उकळत ठेवलेले दूध उतू जाते आणि मग गॅस स्वच्छ करण्याचे आणखी एक काम करावे लागते. शिवाय या सर्वात दूध उतू गेल्याने नुकसान तर होतेच. थोडक्यात काय तर दूध गरम करणे ही एक मोठे जोखमीचे काम असते. जे प्रत्येकाला दिवसभरात एक ते दोनवेळा पार पाडावे लागते. दूध उतू जाऊ नये यासाठी महिलांना नेहमी काही ना काहीतरी शक्कल लढवावी लागते. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत अशा काही टिप्स शेअर करणार आहोत ज्यामुळे तुम्ही गॅसवर दूध गरम करताना निश्चिंत राहू शकता.
भांडे ओले करा
पातेल्यात दूध गरम करण्यापूर्वी त्यात थोडे पाणी टाका. ते चारही बाजूंनी व्यवस्थित फिरवून घ्या. पाणी टाकल्यामुळे दूधाचा थेट संबध भांड्यासोबत येत नाही आणि भांड्याला दूध चिकटत नाही.
दुधात चमचा अथवा पळी ठेवा
दूध गरम करताना त्यामध्ये चमचा अथवा पळी ठेवल्यास दूध पटकन उकळून वर येत नाही आणि उतू जात नाही.
लाकडी चमचा ठेवा
धातू हा उर्जेचे उत्तम वाहक असते मात्र लाकूड उर्जेचे वाहक नाही. त्यामुळे दूध गरम होत असताना भांड्यावर लाकडी चमचा ठेवावा. ज्यामुळे दूध भांड्यातून उतू जाणार नाही.
भांड्याला बटर लावा
दूधाच्या भांड्याच्या कडांना तूपाचा अथवा बटरचा हात लावावा ज्यामुळे दूध उतू जाणार नाही आणि भांड्याच्या कडेला लागणार नाही. लक्षात ठेवा बटर भांड्याच्या कडेला व्यवस्थित लावून घ्या.