बरेच लोक चुकीच्या पद्धतीने शिजवतात डाळ, टेस्टी बनवण्यासाठी वाचा योग्य पद्धत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 13:26 IST2024-07-27T13:26:02+5:302024-07-27T13:26:44+5:30
डाळ शिजवताना काही गोष्टींची काळजी घेतली तर डाळ खराब लागणार नाही किंवा ती बिघडणार नाही.

बरेच लोक चुकीच्या पद्धतीने शिजवतात डाळ, टेस्टी बनवण्यासाठी वाचा योग्य पद्धत!
How To Cook Perfect Dal: डाळ रोज सगळ्याच घरांमध्ये बनवली जाते. साधी डाळ किंवा तडका असलेली डाळ सगळ्यांनाच खायला आवडते. रोज लोक डाळ भात खातात. डाळीमधून शरीराला फायबर, प्रोटीन, मिनरल्स, व्हिटॅमिन्स मिळतात. डाळीचं सेवन लोक वेगवेगळ्या पद्धतीने करतात. बरेच लोक डाळ पातेल्यात शिजवतात तर काही लोक डाळ कुकरमध्ये शिजवतात. पण जास्तीत जास्त लोक चुकीच्या पद्धतीने शिजवतात. ज्यामुळे डाळीची टेस्ट बदलते. डाळ शिजवताना काही गोष्टींची काळजी घेतली तर डाळ खराब लागणार नाही किंवा ती बिघडणार नाही. डाळ शिजवताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
डाळ कशी धुवावी?
तुम्ही ज्या डाळीचा वापर करत आहात ती डाळ कमीत कमी 2 ते 3 पाण्यांनी धुवून घ्या. जेणेकरून डाळीवरील केमिकल्स, पॉलिश निघून जाईल.
डाळ भिजू घाला
डाळ शिजवायला टाकण्याआधी कमीत कमी 15 ते 20 मिनिटे पाण्यात भिजवून ठेवा. असं केल्याने डाळ थोडी फुलेले आणि ती शिजण्यास जास्त वेळ लागणार नाही.
मोजून टाका पाणी
जर तुम्ही एक वाटी डाळ बनवत असाल तर आधी पॅन किंवा प्रेशर कुकरमध्ये तीन ते साडे तीन कप पाणी टाका.
कशी शिजवाल डाळ?
आधी पॅन किंवा प्रेशर कुकरमध्ये पाणी टाका. आता यात एक चमचा मीठ, अर्धा चमचा हळद पावडर टाका. पाण्याला उकडी आली तेव्हा त्यात डाळ टाका. आता यावर छाकण ठेवा किंवा प्रेशर कुकरचं छाकण लावा. गॅस कमी आसेवर राहू द्या. काही वेळाने डाळीवर फेस आला तर छाकण लावण्याआधी तो काढून टाका.
तेल टाका
जर डाळ शिजवताना त्यात थोडं तेल टाकलं तर याने डाळीची चमक वाढेल. तसेच डाळीची टेस्टही चांगली लागेल.
किती वेळ शिजवाल डाळ?
जर तुम्ही प्रेशर कुकरमध्ये डाळ शिजवत असाल तर कमीत कमी 3 ते 4 शिट्या वाजू द्या. गॅसवरून कुकर खाली काढल्यावर शिटी आपोआप उघडू द्या. जर तुम्ही पातेल्यात डाळ शिजवत असाल तर कमी आसेवर 15 मिनिटे शिजू द्या.