शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

झणझणीत, चविष्ट पाटवड्यांची भाजी.... खाल तर बोटं चाखत रहाल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 17:33 IST

जेवणात रोज काय काय नवनवीन करावं. असा प्रश्न घरोघरच्या महिलांना पडत असतो.

जेवणात रोज काय काय नवनवीन करावं. असा प्रश्न घरोघरच्या महिलांना पडत असतो.  कारण त्याच त्याच  भाज्या आणि पाककृती ट्राय करून महिलांना आणि ते खाऊन  घरातल्या मंडळींना कंटाळा आलेला असतो.  जर तुम्ही सुध्दा असा विचार करत असाल तर एक नवीन रेसिपी आज तुम्हाला सांगणार आहोत. घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासून जास्त कोणताही खर्च न करता जेवणासाठी तुम्ही ही  भाजी तयार करू शकता. चला तर मग जाणून घेऊया कशी तयार करायची पाटवड्यांची भाजी. 

(Image credit- You tube)

साहित्य :- हरभरा डाळीचं पिठ १ वाटी २ कांदे , १ टोमॅटो लसूण ४-५  पाकळ्या ओल खोबरे कीसुन २-३ चमचे हळद , काळा मसाला ३ चमचा लाल तिखट १ चमचा  मिठ , सुक खोबरे १/२ वाटी २ आल , कोथिंबीर  तेल .

कृती :- तेल टाकून त्यात एक वाटी डाळीचं पीठ खमंग भाजून घ्यावं त्यात मीठ , तिखट घालून थोडं थोडं पाणी घालत अगदी घट्टसर पिठल्यासारखं करावं. मिश्रण कडेनं सुटू लागले म्हणजे एका ताटाला तेलाचा हात लावून घ्यावा वरील मिश्रण त्यावर थापावं एकसारखं थाप्ल्यावर त्यावर किसलेलं ओल खोबरं आणि कोथिंबीर पेरावी व मोठया चौकोनी वड्या कापून घ्याव्या वड्या थंड झल्यावर त्या एका भांड्यामध्ये काढून घ्याव्यात . 

(Image credit-Youtube)

रस्साः

कांदा, खोबर भाजून घ्या टोमॅटो कापून, लसूण पाकळ्या ,आल ह्याच सर्व मिक्सर मध्ये बारीक वाटण करा.

कढईत तेल टाकून १ बारीक चिरुन कांदा घालून गुलाबी करुन वरील वाटण घाला. तेल सुटले की काळा मसाला & लाल तिखट हे घालून मिक्स करून त्यात पाणी घालून चागंले ऊकळून घ्या रस्सा गरम , उकळता ठेवावा.

ही भाजी वाढताना आधी दोन वड्या ठेवून त्यावर रस्सा घालावा. खोबरं-कोथिंबीर पेरून किंवा आवडीप्रमाणे ही भाजी भाताबरोबर , भाकरी , चपाती सोबत खावी.

(सौजन्य-bred butter) 

टॅग्स :foodअन्नReceipeपाककृती