घरच्या घरी असा बनवा स्पेशल शाही तुकडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2018 12:42 IST2018-05-19T12:42:31+5:302018-05-19T12:42:31+5:30

मुस्लिम समुदायासोबतच खाण्याचे शौकीन लोक या दिवसात वेगवेगळ्या पदार्थांचा मनसोक्त आनंद घेतात.

How to cook a shahi tukda at home | घरच्या घरी असा बनवा स्पेशल शाही तुकडा

घरच्या घरी असा बनवा स्पेशल शाही तुकडा

रमजानचा पवित्र महिना नुकताच सुरु झालाय. या काळात मुस्लिम समुदायातील लोक 30 दिवस उपवास करतात. या दिवसात उपवास सोडताना खाण्याचीही चांगलीच चंगळ असते. मुस्लिम समुदायासोबतच खाण्याचे शौकीन लोक या दिवसात वेगवेगळ्या पदार्थांचा मनसोक्त आनंद घेतात. यात शाही तुकडा या गोड पदार्थाचा नंबर सर्वात वरचा लागतो. चला जाणून घेऊया शाही तुकडा कसा तयार करायचा. 

आवश्यक सामग्री

1 लिटर क्रीम असलेले दूध
400 ग्रॅम मिल्क मेड
6-7 स्लाईस ब्रेड
किशमीश, बदाम
1 लहान चमचा वेलची पावडर
फ्राय करण्यासाठी तूप

शाही तुकडा तयार करण्याची पध्दत

1) एका मोठ्या भांड्यात दूध आणि मिल्क मेड टाकून ते अर्ध होईपर्यंत उकडू द्या. त्यानंतर त्यात वेलची पावडर टाकून मिक्स करा.
2) त्यानंतर ब्रेड स्लाईस हवे त्या आकारात कापा आणि ते गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करा. ते काढून पेपरवर ठेवा. 
3) कडईतील शिल्लक राहिलेलं तूप तसंच ठेवून त्यात ड्रायफ्रूट फ्राय करा. 
4) आता ब्रेडचे तुकडे प्लेटमध्ये ठेवा आणि त्यावर घट्ट झालेलं दूध टाका. 

Web Title: How to cook a shahi tukda at home