गरम मासाल्याचे आरोग्यवर्धक फायदे माहीत आहेत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2018 16:58 IST2018-07-31T16:57:25+5:302018-07-31T16:58:09+5:30
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारतातील संस्कृतीमध्ये ज्याप्रमाणे विविधता आढळते त्याचप्रमाणे खाद्य पदार्थांमध्येही विविधता आढळून येते. आपल्या देशात मसाल्यांच्या पदार्थांमध्येही विविधता आढळते.

गरम मासाल्याचे आरोग्यवर्धक फायदे माहीत आहेत का?
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारतातील संस्कृतीमध्ये ज्याप्रमाणे विविधता आढळते त्याचप्रमाणे खाद्य पदार्थांमध्येही विविधता आढळून येते. आपल्या देशात मसाल्यांच्या पदार्थांमध्येही विविधता आढळते. त्यातील सर्वात जास्त वापरला जाणारा पदार्थ म्हणजे गरम मसाला. पदार्थामध्ये गरम मसाल्याचा वापर केल्याने पदार्थांचा स्वाद वाढतो. परंतु, तुम्हाला याची कल्पना आहे का? पदार्थांची चव वाढवण्यासोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतात. पदार्थांमध्ये यांचा वापर केल्यानं पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे शरीरातील कोलोस्टेरॉल आणि साखरेचे प्रमाणही नियंत्रणात रहाते. जाणून घेऊयात गरम मसाल्याचे शरीरासाठी होणारे फायदे...
- बद्धकोष्ट आणि पचन संस्थेसंदर्भातील सर्व तक्रारींवर गरम मसाला उपयुक्त ठरतो.
- गरम मसाल्यामध्ये समाविष्ट असणाऱ्या जिऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आयर्न असते. यामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी मदत होते.
- मेटाबोलिज्म वाढवण्यासाठी गरम मसाल्याचं सेवन करणं फायदेशीर ठरते.
- तोंडातून येणाऱ्या दुर्गंधावरही गरम मसाला फायदेशीर ठरतो. लवंग दातांच्या समस्यांसाठी फायदेशीर समजले जाते. लवंगामध्ये अॅन्टी-ऑक्सीडंट्स मुबलक प्रमाणात असते.
- गरम मसाल्याच्या वापरामुळे पोट फुगण्याची समस्या दूर होते.
- गरम मसाल्यामध्ये काळ्या मिरीचाही समावेश होतो. कमी वयात दिसणारी वाढत्या वयाची लक्षणं दिसणही कमी होतात.