Health awareness tips : how to know adultrated milk masala food product in home | आजारपणाचं कारण ठरू शकतात भेसळयुक्त पदार्थ; असं ओळखा पीठ, दूध, मध  भेसळयुक्त आहे की नाही

आजारपणाचं कारण ठरू शकतात भेसळयुक्त पदार्थ; असं ओळखा पीठ, दूध, मध  भेसळयुक्त आहे की नाही

तुम्ही आपल्या आरोग्याबाबत कितीही जागरूक असाल तरी बनावट पदार्थांमधील रसायनं, भेसळयुक्त पदार्थ तुमच्या शरीराला हानीकारक ठरू शकतात. सध्या बाजारात भेसळयुक्त अन्नपदार्थ मोठ्या प्रमाणात येत आहेत.  अनेकदा गव्हाच्या पीठात बोरिक पावडर, मैदा,  माती मिसळली जाते. गव्हाच्या पीठाला पांढरे बनवण्यासाठी त्यात अनेकदा तांदळाच्या चुऱ्याचाही वापर केला जातो. आज आम्ही तुम्हाला भेसळयुक्त पदार्थ कसे ओळखायचे याबाबत सांगणार आहोत. जेणेकरून तुम्ही तुमच्या आरोग्याची चांगल्यापद्धतीनं काळजी घेऊ शकता. 

दूध

चांगलं दूध ओळखायचं असेल तर, एखद्या दगडासारख्या गोष्टीवर दुधाचे काही थेंब टाका. त्यानंतर दूध जर वाहून गेले, आणि त्यावर पांढरे डाग राहिले तर दुध शुद्ध आहे. मात्र जर पिवळ्या रंगाचे डाग दिसत असतील तर दुध भेसळयुक्त आहे. त्याचबरोबर दुधात डीटर्जनचा वास येत असेल तर ते दूधसुद्धा भेसळयुक्त मानलं जातं.

मध 

मध शुद्ध आहे की भेसळयुक्त हे तपासण्यासाठी पाण्यामध्ये मधाचे काही थेंब टाका. जर मध खाली पाण्यात जमा झाले तर ते शुद्ध आहे हे सिद्ध होते. मात्र जर मध पाण्यात मिसळले गेले तर ते भेसळयुक्त आहे हे सिद्ध होतं. मध भेसळयुक्त आहे की नाही हे तपासण्यासाठी आयोडीनची गरज आहे. यासाठी मध पाण्यामध्ये मिसळावे लागणार आहे. त्यानंतर या पाण्यात थोडे आयोडीन टाकावे.जर या मिश्रणाचा रंग निळा झाला तर यामध्ये स्टार्च किंवा पीठ मिसळले आहे हे समोर येतं. यामुळे या मधामध्ये भेसळ असल्याचं सिद्ध होतं.आयोडीनच्या मदतीने हे तपासता येतं. 

ब्लोटिंग पेपरवर थोडं मध घ्या. जर मध पेपरने शोषूण घेतलं तर या मधामध्ये भेसळ आहे. किंवा एका लाकडाला कापूस गुंडाळावा. त्यानंतर तो मधामध्ये हे बुडवा आणि त्यानंतर त्याला आग लावा. जर मध जळू लागले तर ते शुद्ध आहे.

तांदूळ

तांदळात सुद्धा मोठ्या भेसळ दिसून येते. जे तांदूळ भेसळयुक्त असतात त्यात एक प्रकारची चकाकी असते. जी नैसर्गिक तांदळात कमी असते. त्याचबरोबर नकली तांदूळ एकाच मापाचे असतात, मात्र जे शुद्ध ओरिजनल तांदूळ असतात ते वेगवेगळ्या आकाराचे असतात. याशिवाय जास्त चमकदार नसतात.

 अरे व्वा! कोरोना लसीचा चमत्कार; कोरोनापासून बचावासह इतरही आजार झाले दूर, महिलेनं सांगितला अनुभव...

चपातीचं पीठ

चांगल्या पीठाची पारख तुम्ही मळताना करू शकता. जर तुम्ही चांगले पीठ मळत असाल तर ते खूप मऊ असते. तसंच या पीठापासून तयार केलेल्या चपात्या चांगल्या फुगतात. भेसळयुक्त पीठाला मळण्यासाठी खूप कमी पाणी लागतं. चपात्यांचा रंग जास्त पांढरा असतो. या पीठाची चपाती व्यवस्थित फुग नाही. एखाद्या च्यूइंगमप्रमाणे ही चपाती खेचली जाते. 

सावधान! लवकर झोपल्याने असतो हार्ट अटॅकचा अधिक धोका, रिसर्चमधून खुलासा...

चण्याचं पीठ

बनावट चण्याचे पीठ ओळखण्यासाठी, एक चमचे चण्याचे पीठ एका टेस्ट ट्यूबमध्ये घाला. नंतर तीन मिली अल्कोहोल घाला आणि मिश्रणाने मिसळा. नंतर हायड्रोक्लोरिक एसिडचे 10 थेंब घाला. जर मिश्रणाचा रंग गुलाबी झाला तर मग समजून घ्या की त्यात मेटानिल येलोची भेसळ झाली आहे.

Web Title: Health awareness tips : how to know adultrated milk masala food product in home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.