वेगवेगळी धान्ये आपल्या आहाराचा महत्त्वपूर्ण भाग आणि ऊर्जेचा प्रमुख स्त्रोत असतात. वेगवेगळ्या धान्यांच्या दाण्यांमध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, चरबी, व्हिटॅमिन्ससोबतच फायबरही भरपूर प्रमाणात आढळतं. तज्ज्ञांनुसार, ही धान्ये आपण आपल्या आहारात जेवढ्या संतुलित प्रमाणात ठेवू, तेवढा जास्त आरोग्यदायी फायदा होईल.
वेगवेगळ्या धान्यांमध्ये गहू हे धान्य जगभरात सर्वात जास्त खाल्लं जातं. जगभरातील बाजारात खाण्याची विकली जाणारी प्रत्येक वस्तूत गहू असतो. चपाती, ब्रेड, बिस्किट, केक, पेस्ट्री, नूडल्स, पास्ता, मॅक्रोनीसारख्या आणखीही कितीतरी पदार्थ तयार करण्यासाठी गव्हाचा वापर केला जातो. गव्हामध्ये मुख्य रूपाने कार्बोहायड्रेट असतात, पण यात प्रोटीन, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, अॅंटीऑक्सिडेंट्स आणि फायबर सुद्धा भरपूर आढळतं.
पोषक तत्त्वांचा खजिना गहू
पोषक तत्व आणि ऊर्जेचा स्त्रोत असलेला गहू हा आहाराचा मुख्य आधार आहे. याच्या सेवनाने वजन नियंत्रणात राहतं, टाइप २ डायबिटीस आणि कोरोनरी हार्ट डिजीजचा धोकाही कमी होतो. योग्य प्रमाणात गव्हापासून तयार पदार्थ खाल्ल्याने मेटाबॉजिज्म योग्य प्रकारे काम करतं आणि शरीरात चांगल्या कोलेस्ट्रॉलचं प्रमाणही वाढतं.
मिसळून जाणारं फायबर
गव्हात आढळणारे फायबर हे सहजपणे शरीरात मिसळणारे असतात. ते पचन मार्गातून त्याच रूपात बाहेर पडतात. याने मल मुलायम आणि जड होते, त्यामुळे ते पास करणं सोपं जातं. तसेच पोटाची समस्याही होत नाही. गव्हाच्या पदार्थांच्या सेवनाने आतड्याच्या कॅन्सरचा धोकाही कमी होतो. कारण यात फायबर, अॅंटीऑक्सिडेंट्स आणि फायटो केमिकल्स भरपूर प्रमाणात असतात.
जास्त खाऊ नका
गव्हामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण भरपूर असतं. याचा प्रभाव ब्लड शुगरवर पडतो. गव्हाच्या सेवनामुळे रक्तात शुगरचं प्रमाण वेगाने वाढू लागतं, ज्यामुळे शरीरावर नुकसानदायक प्रभाव बघायला मिळतात. खासकरून ज्यांना डायबिटीस आहे त्यांच्यात. या लोकांमध्ये ऑक्जेलेटचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे गव्हाचं सेवन जास्त प्रमाणात करू नये.
अधिक प्रमाणात ऑक्जेलेटचं सेवन केल्याने आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात. जसे की, किडनी स्टोन, गॉल ब्लॅडर स्टोन आणि आथ्ररायटिस. अनेक रिसर्चमधून असेही समोर आलं आहे की, ग्लूटन(गव्हात आढळणारं प्रोटीन)चं अधिक सेवन केल्यास सिजोफ्रेनिया आणि फिट येणे अशा मानसिक आजारांचाही धोका वाढतो.