रोजच्या कॉफीला द्या नवा ट्वीस्ट, ट्राय कराल तर सर्व पेय विसरुन जाल...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 05:23 PM2021-06-13T17:23:54+5:302021-06-13T17:24:34+5:30

नियमित स्वरूपात कॉफीचं सेवन केल्यास, डोकं, लिव्हर आणि डागविरहित त्वचा तुम्हाला मिळते. जाणून घेऊया. चॉकलेट कॉफी तयार करण्याची रेसिपी...

Give daily coffee a new twist, try it and forget all the drinks ... | रोजच्या कॉफीला द्या नवा ट्वीस्ट, ट्राय कराल तर सर्व पेय विसरुन जाल...

रोजच्या कॉफीला द्या नवा ट्वीस्ट, ट्राय कराल तर सर्व पेय विसरुन जाल...

googlenewsNext

कॉफी जितकी स्वादिष्ट असते त्याचे फायदेही तितकेच. आपल्याला आलेला थकवा आणि आळस काढून टाकण्यासाठी याचा सर्वात महत्त्वाचा उपयोग होतो कारण यामधील अँटिऑक्सिडंट्स यासाठी महत्त्वाचं पोषण असतात.वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर ठरते. कॉफी हे अगदी वेगळंच मिश्रण आहे. सकाळच्या वेळी कॉफी हे एक परफेक्ट एनर्जी ड्रिंक आहे तर याव्यतिरिक्त तुमचं सौंदर्य वाढवण्यासाठीही हे नैसर्गिक साहित्य आहे. कॉफीचा एक कप तुम्ही रोज प्यायलात तर तुम्हाला मधुमेहापासून दूर ठेवण्यासाठी याची मदत होते. तसंच तुमचं मेटाबॉलिजम चांगलं राखण्यासाठीही कॉफीची मदत होते. नियमित स्वरूपात कॉफीचं सेवन केल्यास, डोकं, लिव्हर आणि डागविरहित त्वचा तुम्हाला मिळते. जाणून घेऊया. चॉकलेट कॉफी तयार करण्याची रेसिपी

साहित्य
१ मोठा कप (कॉफी मग) थंड दूध
५ टेबल स्पून पिठीसाखर
२ टेबल स्पून साय
२ टेबल स्पून क्रिम
२ टेबल स्पून कॉफी
३ टेबल स्पून साखर
२ टेबल स्पून गरम पाणी
१ /२ वाटी चॉकलेट क्रश
४ टेबल स्पून चॉकोचिप्स
आवडीनुसार चॉकलेट सिरप
कृती
प्रथम एका भांड्यात २ टेबल स्पून कॉफी मध्ये ३ टेबल स्पून साखर २ टेबल स्पून गरम पाणी घालून छान मिक्स करा. ५ मिनिटे कॉफीचा कलर चेंज होऊ पर्यंत चमच्याने ढवळत राह. कॉफी छान फ्लफी होते.

आता मिक्सर मध्ये २ टेबल स्पून साय, ५ टेबल स्पून पिठीसाखर, १ मोठा कप थंंड दूध, २टेबल स्पून क्रिमआणि २ टेबल स्पून तयार केलेली फ्लफी कॉफी ॲड करून ३ मिनिटे छान मिक्सर मध्ये फिरवून घ्या.

नंतर १ चमचा चॉकोचिप्स आणि १ चमचा चॉकलेट क्रश १ चमचा तयार केलेली फ्लफी कॉफी घाला आणि वरून मिक्सर मध्ये बनवलेली कॉफी ॲड करा. आता वरून भरपूर चॉकलेट क्रश टाका आणि सर्व्ह करा.

Web Title: Give daily coffee a new twist, try it and forget all the drinks ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.