शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

Ganesh Chaturthi 2020 : यंदा बाप्पासाठी झटपट 'असे' तयार करा रेखीव, सुबक उकडीचे मोदक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 16:50 IST

अनेकदा व्यवस्थित मोदकांचा बेत फसतो. ही पद्धत वापरल्यानं बाप्पाला आणि तुम्हा आम्हा सगळ्यांना आवडणारे मोदक मस्त सुबक आणि रेखीव होतील.

प्रतिष्ठापनेनंतर बाप्पाला मोदकांचा नैवेद्य दाखवण्यात येतो. अनेकदा हे मोदक बाजारातून विकत आणले जातात. पण फेस्टिव्ह सिझनमध्ये बाजारात मिळणाऱ्या मिठाईमध्ये भेसळ आढळून येते. या भेसळयुक्त पदार्थांपासून दूर राहण्यासाठी विघ्नहर्त्याला घरीच आपल्या हाताने तयार केलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवणं कधीही उत्तमच. गणरायाच्या नैवेद्यासाठी घराघरात उकडीच्या मोदकांचा घाट घातला जातो.

अनेकदा व्यवस्थित मोदकांचा बेत फसतो. ही पद्धत वापरल्यानं बाप्पाला आणि तुम्हा आम्हा सगळ्यांना आवडणारे मोदक मस्त सुबक आणि रेखीव होतील. अत्यंत कमीतकमी वेळात तुम्ही बाप्पाला नैवेदय दाखवू शकता. आज आम्ही तुम्हाला सोपी आणि झटपट होणारी उकडीच्या मोदकांची रेसिपी सांगणार आहोत. 

उकडीच्या मोदकांसाठी लागणारं साहित्य :

४ वाट्या तांदळाची पिठी

३ वाट्या पाणी

१ पळी तेल

१ लहान चमचा साजूक तूप

चवीपुरते मीठ

१ वाटी ओलं खोबरं

पाऊण वाटी चिरलेला गूळ

उकडीचे मोदक तयार करण्याची कृती :

- एका भांड्यामध्ये तूप घ्या. 

- त्यामध्ये खवलेलं खोबरं आणि गूळ एकत्र करून शिजवून घ्या.

- प्रथम एका भांड्यात पाणी उकळत ठेवा.

- थोडं गरम झाल्यावर त्यात मीठ आणि तेल टाका. 

- पाणी चांगले उकळले गेले की त्यात तांदळाची पिठी घाला. 

- नीट एकत्र करून एक वाफ आणून मग त्यात साजूक तूप घालून पुन्हा एक वाफ घ्या. 

- थंड झाले की ताटात काढून उकड मळून घ्या.

- उकडीचा एक लहान गोळा करून तो तांदुळाच्या पिठी मध्ये घोळवून घ्या.

- उकडीला खोलगट वाटीचा आकार द्या.

- त्यामध्ये खोबरं आणि गुळाचं शिजवलेलं सारण भरा.

- त्यानंतर वाटीला एक एक करून पाकळ्या काढा. पाकळ्या जितक्या जवळ आणि सारख्या अंतरावर असतील तेवढा मोदक आकर्षक दिसेल.

- त्यानंतर तळव्यावर ठेवून बोटांच्या साहाय्याने पाकळ्या बंद करून वरच्या बाजूला टोक ठेवा.

- रेखीव आणि मुलायम उकडीचे मोदक बाप्पासाठी तयार आहेत. 

हे पण वाचा-

चहासोबत कुरकुरीत मक्याची भजी खाल तर खातच राहाल; नक्की ट्राय करा 'ही' चमचमीत रेसिपी

चवीला एकदम बढीया; खमंग, खुसखुशीत अळूवड्या, एकदा खाल खातच रहाल.....

टॅग्स :foodअन्नGanesh Chaturthi Recipesगणेश चतुर्थी रेसिपीReceipeपाककृती