काही फूड रिसर्चनुसार जर तुम्हाला शरीराला योग्य आहारातून आणि योग्य प्रमाणात पोषक तत्त्व द्यायचे असतील तर तुम्ही काय खाता यापेक्षा कोणता पदार्थ कशासोबत खाता हे महत्त्वाचं ठरतं. आम्ही तुम्हाला असे काही पदार्थ सांगणार आहोत जे स्वत: तर सुपरफूड आहेतच. मात्र त्यांच्यासोबत इतर काही पदार्थ खाल्ले त्यांचा दुप्पट फायदा शरीराला होतो. म्हणजे दोन वेगवेगळे पदार्थ एकत्र खाल्ले तर पोषक तत्त्व दुप्पट मिळतील. त्यामुळे तुम्हाला माहीत असायला हवं की, कोणत्या पदार्थासोबत काय खाल्ल्याने फायदा होईल.
सफरचंद आणि चॉकलेट
सफरचंद आणि डार्क चॉकलेट एकत्र करून खाल्ल्यास हृदयासाठी फायदेशीर ठरतं असं सांगितलं जातं. याचं कारण सफरचंदाच्या सालीमध्ये असलेलं फ्लॅवनॉयड क्वेर्सेटिन शरीरात अॅटी-इनफ्लेटमेट्रीचं काम करतं. तर डार्क चॉकलेटमधील कोकोमध्ये कॅटेचीन नावाचं अॅंटीऑक्सिडेंट असतं, ज्याने हृदयातील आर्टरीज हार्ड होण्यापासून बचाव केला जातो. सफरचंद आणि डार्क चॉकलेट एकत्र खाल्ल्याने शरीरात रक्ताच्या गाठीही होत नाहीत.
कसे खाल - डार्क चॉकलेट वितळवून घ्या आणि नंतर त्यात सफरचंदाचे स्लाइसेस बुडवून खावे.
हळद आणि काळे मिरे
हळदीमध्ये असलेलं कर्क्युमिन या मसाल्याला सुपरफूड बनवतं. यात अॅंटीइन्फ्लेमेट्री तत्त्व भरपूर प्रमाणात असतात. पण हे एक असं पोषक तत्त्व आहे, जे शोषण्यासाठी शरीराला काही अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे तुम्ही हळदीमध्ये चिमुटभर काळे मिरे मिश्रित करा. ज्यात पिपरेन भरपूर प्रमाणात असतं. याने हळदीतील कर्क्युमिन शरीरात सहजपणे शोषलं जाईल.
कसे खाल - तुम्ही दुधात हळद आणि चिमुटभर काळे मिरे मिश्रित करू शकता किंवा भाज्यांमध्येही याचा वापर करू शकता.
टोमॅटो आणि ऑलिव्ह ऑइल
शरीरासाठी ३ ते ५ ग्रॅम फॅट गरजेचं असतं, जे तुम्हाला ऑलिव्ह ऑइलमधून मिळू शकतं. ऑलिव्ह ऑइलमध्ये कॅरोटेनॉयड नावाचं अॅंटी-ऑक्सिडेंट असतं. तर टोमॅटोमध्ये लायकोपीन भरपूर प्रमाणात असतं. लायकोपीन हे सुद्धा एकप्रकारचं कॅरोटेनॉयड आहे. जे इन्फ्लेमेशन ऑक कोलेस्ट्रॉल कमी करून इम्यून फंक्शन मजबूत करतं.
कसे खाल - छोटे चेरी टोमॅटो तुम्ही १ तास ऑलिव्ह ऑइलमध्ये शिजवून साइड डिश म्हणून खाऊ शकता. किंवा याचं सलादही तयार करू शकता. टोमॅटो कापून त्यावर ऑलिव्ह ऑइल टाका आणि खा.
दूध आणि केळी
हे कॉम्बिनेशन तर प्रत्येकालाच पसंत असेल. दुधातून कॅल्शिअम भरपूर प्रमाणात मिळतात. याने हाडे मजबूत होण्यास मदत मिळते. सोबतच दात आणि मांसपेशींची क्रियाही चांगली होते. मात्र कॅल्शिअम सुद्धा शोषूण घेण्यासाठी शरीराला अडचण जाते. त्यामुळे दुधात केळी टाकून खाल्ल्यास केळीतील फायबर दुधातील कॅल्शिअम शोषूण घेण्यास मदत करतं.