शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

पुण्यातील या सात ठिकाणी मिळणाऱ्या पावभाजीची चव तुम्ही चाखलीत का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2018 19:24 IST

पुणेकरांमध्ये मिसळप्रमाणे पावभाजी सुद्धा तितकीच फेमस अाहे. तेव्हा तुम्ही पुण्यात अाहात अाणि पावभाजी खायचा प्लॅन करताय तर पुण्यातील या सात ठिकाणांना नक्की भेट द्या.

पुणे : पावभाजी न अावडणारी व्यक्ती अभावानेच अाढळेल. पावभाजीचं नाव घेताच अनेकांच्या ताेंडाला पाणी सुटते. दिवसातील वेळ कुठलिही असाे पावभाजी कधीही चालते. पुणेकरांमध्ये मिसळप्रमाणे पावभाजी सुद्धा तितकीच फेमस अाहे. तेव्हा तुम्ही पुण्यात अाहात अाणि पावभाजी खायचा प्लॅन करताय तर पुण्यातील या सात ठिकाणांना नक्की भेट द्या. 

1) सुप्रिम काॅर्नर, जंगली महाराज रस्ता पावभाजीसाठी तरुणाईचे शहरातील सर्वात अावडीचे ठिकाण म्हणजे सुप्रिमची पावभाजी. शहरातल्या बेस्ट पावभाजी मिळणाऱ्या ठिकाणांपैकी एक असलेल्या सुप्रिमची पावभाजी एकदा तरी ट्राय करायलाच हवी. चवदार पावभाजी अाणि त्या साेबत असणारा कुरकुरीत पाव जेवणाची मजा द्विगुणित करताे. पावभाजी साेबतच सुप्रिमचा पिझ्झा अाणि पुलाव सुद्धा नक्की ट्राय करा. 

2) किर्ती ज्युस सेंटर, एफसी राेडस्वस्तात मस्त पावभाजी खायची असेल तर किर्ती ज्युस सेंटरला मिळणारी पावभाजी तुमच्यासाठी अाहे. तिखट चटपटीत भावभाजी जेवणाची रंगत वाढवते. लहान मुलांसाठी कमी तिखट असलेली मुन्ना पावभाजी येथील खासीयत अाहे. कमी तिखट मात्र बटरने भरलेली पावभाजी मुलांच्या पसंतीस उतरते. इथला तवा पुलाव सुद्दा उत्तम लागताे. 

3) रिलॅक्स, सहकारनगर नावाप्रमाणेच येथील पावभाजी खाल्यानंतर तुम्ही रिलॅक्स फिल करता. बटरने भरलेली पावभाजी अाणि मिल्कशेक घेतला की बास तुमचा दिवसच झाला. राेज संध्याकाळी येथे गर्दी असते. त्यामुळे या पावभाजी सेंटरला नक्की भेट द्या.  

4) गिरीजा ज्युस बार, सिंहगड राेड पुण्यातल्या फेमस पावभाजी सेंटर पैकी एक असलेले सिंहगड राेडवरील गिरीजा ज्युस बार. बटरने माखलेले पाव अाणि त्यासाेबत चवदार अशी पावभाजी. तुम्ही केवळ एकच पावजाेडी खाऊन उठताल असं हाेणारच नाही. खूपवेळ या पावाभाजीची चव तुमच्या चिभेवर रेंगाळत राहते. इथली मिसळ सुद्धा अप्रितिम असते. 

5) अजुबा,कर्वेनगर अजुबाच्या बाहेरची गर्दी पाहूनच येथील पावाभाजी कशी असेल याचा अंदाज तुम्हाला येईल. तिखट, भरपूर बटर अाणि हाे तुमच्या खिशाला परवडणारी पावभाजी तुम्हाला येथे खायला मिळेल. येथे येणाऱ्या खवय्यांसाठी येथील पावभाजी म्हणजे एक पर्वणीच असते. त्यामुळे कर्वेनगरला जात असाल तर अजुबाची पावभाजीची चव नक्की चाखा अाणि हाे एक्स्ट्रा बटर घ्यायला विसरु नका.  6) समुद्र,कर्वेनगर ब्रेकफास्टसाठी काहीतरी चटपटीत खायचंय तर समुद्रची पावभाजी तुमच्यासाठीच अाहे. समुद्र स्पेशल पावभाजी तर तुम्ही एकदा नक्की ट्राय कराच तुम्हाला मुंबई चाैपाटीच्या पावभाजीची अाठवण हाेईल. 

7) जयश्री, टिळक राेडबाहेरगावावरुन पुण्यात अालाय किंवा कामावरुन उशीरा निघालात अाणि सगळे हाॅटेल बंद झाले अाहेत. काळजी करायची गरज नाही. टिळक राेडच्या जयश्रीत तुम्हाला उत्तम पावभाजी मिळेल. तिखट, कमी तिखट, गाेट तुम्हाला हवी तशी पावभाजी येथे मिळते. त्याजाेडीला बटर लावून भाजलेला पाव मैफीलीला चार चांद लावताे. इथला पास्ता सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. 

टॅग्स :Puneपुणेfoodअन्नStudentविद्यार्थी