चौपाटी स्टाईल चटपटीत, चमचमीत चना चाट घरी बनवून तर बघा !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 02:06 PM2020-03-02T14:06:29+5:302020-03-02T14:21:54+5:30

घरच्या घरी काही मिनिटात बनणारा चना चाट हा पदार्थ चवीला तर भन्नाट आहेच पण तेल न वापरता आणि भरपूर भाज्या वापरल्याने पौष्टिकही आहे. 

Choupati style recipe of tasty Chana Chaat | चौपाटी स्टाईल चटपटीत, चमचमीत चना चाट घरी बनवून तर बघा !

चौपाटी स्टाईल चटपटीत, चमचमीत चना चाट घरी बनवून तर बघा !

Next

चटपटीत आणि चमचमीत खाणे तर सर्वांना आवडते. त्यातही तो पदार्थ चाट प्रकारात मोडणारा असेल तर अनेकांचा जीव की प्राण असतो. घरच्या घरी काही मिनिटात बनणारा चना चाट हा पदार्थ चवीला तर भन्नाट आहेच पण तेल न वापरता आणि भरपूर भाज्या वापरल्याने पौष्टिकही आहे. 

साहित्य :

भिजवलेले हरबरे 

उकडलेला बटाटा एक 

कांदा बारीक चिरून 

टोमॅटो बारीक चिरून 

कोथिंबीर बारीक चिरून 

शेव दोन ते चार चमचे 

लिंबाचा रस किंवा बारीक चिरलेली कैरी 

चाट मसाला 

लाल तिखट 

मीठ 

कृती :

  • भिजवलेले चणे दोन शिट्ट्या घेऊन उकडून घ्या. 
  • त्यातले पाणी काढून चणे एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्या. 
  • आता त्यात उकडून हाताने मॅश केलेला बटाटा, चिरलेला कांदा, टोमॅटो घाला. 
  • आता त्यात लाल तिखट, मीठ, चाट मसाला घाला. 
  • शेवटी लिंबू पिळून किंवा कैरीचे तुकडे टाका. 
  • सर्व्ह करताना ऐन वेळी कोथिंबीर आणि शेव घालून सर्व्ह करा चणा चाट 
  • यात कोणतेही तेल वापरण्याची गरज नाही. 

Web Title: Choupati style recipe of tasty Chana Chaat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app