शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
5
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
6
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
7
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
8
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
9
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
10
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
11
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
12
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
13
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
14
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
15
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
16
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
17
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
18
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
19
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
20
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं कोबीचं सूप; असं करा तयार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2019 18:34 IST

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपल्यापैकी अनेक लोकांना लठ्ठपणाचा सामना करावा लागत आहे. प्रमाणापेक्षा जास्त वाढलेल्या वजनामुळे अनेकदा शरीराच्या विविध समस्यांचा सामना करावा लागतो.

(Image Credit : International Vegan)

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपल्यापैकी अनेक लोकांना लठ्ठपणाचा सामना करावा लागत आहे. प्रमाणापेक्षा जास्त वाढलेल्या वजनामुळे अनेकदा शरीराच्या विविध समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच मग वजन कमी करण्यासाठी अनेक फंडे वापरण्यात येतात. यापासून सुटका करून घेण्यासाठी अनेकजण जिम किंवा डाएट फॉलो करत असतात. जर तुम्हीही त्यांच्यापैकीच असाल आणि वाढलेलं वजन कमी करण्यासाठी अतोनात प्रयत्न करत असाल, तर आम्ही तुम्हाला काही हेल्दी आयडिया सांगणार आहोत. त्यापैकीच एक हेल्दी आयडिया म्हणजे, कोबीचं सूप. मुबलक प्रमाणात पोषक तत्व असल्यामुळे कोबीचं सूप वजन कमी करण्यासोबतच शरीराला आवश्यक पोषक तत्व पुरविण्यासाठीही फायदेशीर ठरतं. कोबीचं सूप फायदेशीर

कोबीचं सूप वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतं. हे सूप प्यायल्याने लवकर पोट भरतं आणि शरीराला अनेक पोषक तत्वही मिळतात. भाज्यांपासून तयार करण्यात आलेलं सूप प्यायल्याने त्वचाही चमकदार होते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये इतर भाज्याही एकत्र करू शकता. जाणून घेऊया कोबीचं सूप तयार करण्यासाठी लागणारं साहित्य आणि पद्धत...

साहित्य :

  • कोबी 
  • बारिक चिरलेला कांदा
  • टॉमेटो 
  • शिमला मिरची
  • काळी मिरी
  • लिंबाचा रस
  • मीठ चवीनुसार

 

कृती :

- सर्वात आधी कोबी आणि टॉमेटो पाण्याने स्वच्छ करून चिरून घ्या. 

- आता एक पॅन गॅसवर ठेवून त्यामध्ये कांदा परतून घ्या.

- कांदा परतल्यानंतर त्यामध्ये कोबी, मीठ एकत्र करून शिजवून घ्या.

- तयार मिश्रणामध्ये 3 ते 4 कप पाणी एकत्र करून 2 ते 3 मिनिटांसाठी शिजवून घ्या.

- आता तयार मिश्रणामध्ये टॉमेटो, काळी मिरी एकत्र करून 2 ते 3 मिनिटांसाठी शिजवून घ्या.

- आता यामध्ये शिमला मिरची 8 ते 9 मिनिटांसाठी शिजवून घ्या.

- सर्वात शेवटी लिंबाचा रस एकत्र करून गॅस बंद करा. 

- कोबीचं हेल्दी आणि टेस्टी सूप तयार आहे. 

- गरमा गरम सर्व्ह करा कोबीचं सूप. 

टॅग्स :ReceipeपाककृतीHealthy Diet Planपौष्टिक आहारWeight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स