शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

मासिक पाळीच्या वेदना दूर करतो 'हा' खास चहा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 16:31 IST

व्यायम केल्यानंतर शरीरामध्ये अनेक वेदना होत असतात. एवढचं नाही तर अनेक महिलांना मासिक पाळीमध्ये होणाऱ्या तीव्र वेदनांचा सामना करावा लागतो.

व्यायम केल्यानंतर शरीरामध्ये अनेक वेदना होत असतात. काही लोक तर अनेक दिवसांनंतर सतत वर्कआउट करतात, त्यामुळे त्यांचे स्नायूंमध्ये प्रचंड वेदना होत असतात. व्यायामानंतर होणाऱ्या वेदनांमुळे लोक एक्सरसाइज करणं सोडतात. तुम्हाला जर या वेदनांपासून सुटका करून घ्यायची असेल तर तुम्ही काही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता. 

एवढचं नाही तर अनेक महिलांना मासिक पाळीमध्ये होणाऱ्या तीव्र वेदनांचा सामना करावा लागतो. मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदनांमुळे महिला आपलं काम व्यवस्थित करू शकत नाहीत. या दोन्ही बाबतींमध्ये होणाऱ्या वेदनांपासून सुटका करण्यासाठी फायदेशीर ठरणारा रामबाण उपाय म्हणजे, मेथीचे दाणे. मेथीचे दाणे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात. मेथीमध्ये मुबलक प्रमाणात आयर्न आढळून येतं. जे महिलांसाठी अत्यंत आवश्यक असतं. आज आम्ही तुम्हाला मेथीच्या दाण्यांपासून तयार करण्यात येणाऱ्या चहाबाबत सांगणार आहोत. 

तरूणी आणि महिला मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या प्रचंड वेदनांचा सामना करतात. अशातच त्यांच्यासाठी मेथीच्या दाण्यापासून तयार करण्यात आलेल्या चहाचे सेवन करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. यामुळे तुम्हाला पोटाच्या समस्यांपासून सुटका होण्यास मदत होते. 

मेथीच्या दाण्यांपासून असा तयार करा चहा

- सर्वात आधी एका भांड्यामध्ये 4 ते 5 कप पाणी घेऊन उकळण्यासाठी गॅसवर ठेवा. 

- पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मेथीचे दाणे किंवा मेथीची पावडर टाका

- भांड्यावर झाकण ठेवून पुन्हा चहा उकळून घ्या. 

- जेव्हा याचा रंग बदलेल त्यावेळी गॅसवरून उतरून घ्या आणि थंड होण्यासाठी ठेवा.

 - मेथीपासून तयार करण्यात आलेला चहा तयार आहे.

तयार चहा मासिक पाळीतील वेदना दूर करण्यासाठी किंवा व्यायाम केल्यानंतर होणाऱ्या स्नायूंच्या वेदना कमी होण्यासाठी मदत करतात. चवीला हा चहा थोडासा कडवट लागतो. पण वेदना दूर करण्यासोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतो. 

मेथी खाण्याचे आणखी काही फायदे :

- मेथीचे दाणे आर्थरायटीस आणि साईटिका समस्यांवर रामबाण उपाय आहेत. सुमारे एक ग्राम मेथीदाण्यांची पावडर आणि सुंठ पावडर यांचे मिश्रण गरम पाण्यातून दिवसभर दोन-तीन वेळा घेतल्याने लाभ होतो. तसेच एक चमचा मेथीदाणे पाण्यासोबत घेतल्यास अपचनाचीही समस्या दूर होते. 

- मेथी केसांसाठीही उपयुक्त आहे. केसांमध्ये कोंडा झाला असेल तर मेथीच्या दाण्यांची पेस्ट डोक्याला लावा. त्यानंतर अर्ध्या तासाने केस धुवा. सुती कापडाने पुसा. 

- केस गळती थांबविण्यासाठी मेथीदाणे रात्रभर नारळाच्या गरम तेलात भिजवून ठेवा. सकाळी या तेलाने डोक्याला मसाज करा.

- मेथी आणि सुंठ समान प्रमाणात घेऊन चूर्ण तयार करून घ्या. या चूर्णामध्ये गुळ टाकून खाल्ल्यास संधिवाताची समस्या दूर होण्यास मदत होईल. 

- मेथीदाण्याची पावडरची पेस्ट तयार करून त्वचेवर लावल्यास जळाल्याचे व्रण दूर होण्यास मदत होईल.

- पोटातील गॅस आणि छातीतील कफ दूर करण्यासाठी मेथी रामबाण औषधीचे काम करते. दररोज 5 ग्रॅम मेथीचे चूर्ण सकाळ-संध्याकाळ खाल्ल्याने वात रोग दूर होतात.

टॅग्स :Ayurvedic Home Remediesघरगुती उपायWomenमहिलाFitness Tipsफिटनेस टिप्सHealthy Diet Planपौष्टिक आहारHealth Tipsहेल्थ टिप्स