उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 18:59 IST2026-04-12T18:55:56+5:302026-04-12T18:59:44+5:30

बाजारात मिळणारे प्रत्येक खरबूज गोड आणि रसरशीत असेलच असे नाही. त्यामुळे योग्य फळ निवडण्यासाठी काही खास टिप्लस...

Are you a fan of eating muskmelon in the summer Use these simple tips and know if it's sweet or not | उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!

उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!

उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी आणि फळांचे सेवन अत्यंत आवश्यक असते. खरबूज हे या ऋतूतील एक महत्वाचे आणि साधारणपणे सर्वांनाच आवडणारे फळ. हे केवळ थंडावा देत नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. मात्र, बाजारात मिळणारे प्रत्येक खरबूज गोड आणि रसरशीत असेलच असे नाही. त्यामुळे योग्य फळ निवडण्यासाठी काही खास टिप्लस...

असे निवडा योग्य खरबूज -
खरबूज खरेदी करताना सर्वप्रथम त्याचा खालचा भाग तपासावा. जर खालचा भाग गडद रंगाचा असेल, तर ते फळ चांगले पिकलेले आहे असे समजावे. फिकट रंगाचा भाग असल्यास खरबूज कच्चे असण्याची शक्यता असते. तसेच, फळाच्या वासावरूनही त्याचा गोडवा ओळखता येतो.

सालीचा रंग आणि वजन -
पिकलेल्या खरबुजाचा रंग साधारणपणे फिकट पिवळा असून त्यावर हिरव्या रेषा असतात. जर खरबूज पूर्णपणे हिरवे दिसत असेल, तर ते खरेदी करणे टाळावे. वजनाचा विचार करता, हलके खरबूज सहसा जास्त गोड आणि रसरशीत असते. याउलट जास्त जड खरबुजात बिया अधिक आणि गोडवा कमी असू शकते. तसेच, अतिशय मऊ किंवा दबलेले खरबूज खराब असू शकते.

स्टोअर करण्याची पद्धत -
खरबूज आणल्यानंतर, ते खोलीच्या तापमानात ठेवावे. मात्र, फळ कापल्यानंतर उरलेला भाग एअरटाइट डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवावा. यामुळे ते जास्त काळ ताजे राहते. लक्षात ठेवा, खरबुजाचा तीव्र वास इतर फळांच्या चवीवर परिणाम करू शकतो, त्यामुळे ते इतर फळांसोबत ठेवू नका. शिवाय, याच्या बिया फेकून न देता धुवून व वाळवून विविध पदार्थांमध्ये वापरता येतात.

 

Web Title: Are you a fan of eating muskmelon in the summer Use these simple tips and know if it's sweet or not