शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
2
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
3
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
4
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
5
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
6
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
7
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
8
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
9
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
10
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
11
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
12
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
13
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
14
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
15
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
16
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
17
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
18
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
19
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
20
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर

उन्हाळ्यात खाण्यासाठी टेस्टी अन् हेल्दी फ्रुड्स; एकदा खाऊन बघाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 19:04 IST

आपल्यापैकी अनेकजण खाण्या-पिण्याचे शौकीन असतात. ज्यांना 'फूडी' म्हणून ओळखलं जातं. अशा व्यक्तींना प्रत्येक सीझनमध्ये काही खास पदार्थ खाण्याची इच्छा होते.

(Image Credit : lifealth.com)

आपल्यापैकी अनेकजण खाण्या-पिण्याचे शौकीन असतात. ज्यांना 'फूडी' म्हणून ओळखलं जातं. अशा व्यक्तींना प्रत्येक सीझनमध्ये काही खास पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशा व्यक्तींना देश-विदेशातील कोणत्याही कोपऱ्यात गेल्या तरिही तेथील खास आणि पारंपारिक पदार्थ चाखण्याची इच्छा असते. सध्या उन्हाळ्याचं सीझन सुरू आहे. जर तुम्हीही फूडी असाल आणि या सीझनचा पूर्ण आनंद घेण्याची इच्छा असेल तर हे फ्रुट्स आणि यापासून तयार करण्यात येणारे पदार्थ चाखायला विसरू नका. 

1. कलिंगड 

चविष्ट आणि मुबलक प्रमाणात पाण्याचा स्त्रोत असणारं कलिंगड तुम्ही खाऊ शकता. कलिंगड खाण्यासाठी चविष्ट असण्यासोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतो. खाण्यासाठी अत्यंत हलकं असणारं कलिंगड उन्हाळ्यात सन स्ट्रोकपासून सुटका करण्यासाठी मदत करतं. तुम्ही वॉटरमेलन शेक, ज्यूस, आइस्क्रिम, पंच करून पिऊ शकता. 

2. काकडी 

काकडी पाहायला गेलं तर सलाडचा भाग आहे, परंतु उन्हाळ्यामध्ये तुम्ही नेहमी लोकांना काकडी कापून त्यावर थोडंसं लिंबू पिळून खाताना पाहिलं असेल. उन्हाळ्यात पोटाच्या समस्या दूर ठेवण्यासाठी काकडी मदत करते. तुम्ही काकडीचा ज्यूस करून पिऊ शकता. 

3. टोमॅटो

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे फळ आहे की भाजी? यावरही अनेक मतभेद आढळून येतात. पण हे काहीही असलं तरिही हे आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक आहे. त्यामुळे सलाडप्रमाणे खा. यामध्ये असणारे अॅन्टीऑक्सिडंट्स अनेक आजारांपासून दूर ठेवण्यासाठी मदत करतात. 

4. आंबा 

आंबा म्हणजे फळांचा राजा आणि उन्हाळ्याचा बादशाह असं म्हटलं तरिही वावगं ठरणार नाही. उन्हाळ्यामध्ये लोक आंब्याचा मिल्कशेक पिणं पसंत करतात. याशिवाय आंब्याची भाजी, चटणी आणि इतर चविष्ट मिठाया तयार करण्यात येतात. आंब्याच्या फायद्यांबाबत बोलायचे झाले तर, आंबा वजन कमी करण्यासाठी, पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतो. यामध्ये असलेलं पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स शरीराचं डिहायड्रेशनपासून रक्षण करून ब्लोटिंगची समस्या दूर करतात. 

5. स्ट्रॉबेरी 

फक्त चव किंवा सुगंध नाही तर स्ट्रॉबेरी आरोग्य आणि सौंदर्यासाठीही फायदेशीर ठरते. जर तुम्हालाही स्ट्रॉबेरी आवडत असेल तर उन्हाळ्यामध्ये या फळाचा नक्की समावेश करा. यामध्ये असलेले अॅन्टीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्स उत्तम आरोग्यासाठी आणि चेहऱ्यावरील रिंकल्स दूर ठेवण्यासाठी मदत करतात. टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. 

टॅग्स :Healthy Diet Planपौष्टिक आहारHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यSummer Specialसमर स्पेशल